काजव्यांच्या झगमगाटाची पर्यटकांना भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 01:13 AM2018-06-06T01:13:46+5:302018-06-06T01:13:46+5:30
घोटी : धरतीला मान्सूनची चाहुल लागली असून, काजव्यांच्या चकमक चंदेरी दुनियेने भंडारदरा परिसर उजळून निघाला आहे. येथील हिरडा, बेहडा, सादडा वृक्षांवर काजवे नृत्य करताना दिसत असून, या प्रकाशमयी तारकांचे आगमन म्हणजेच मान्सून आल्याचा संकेत असल्याचे आदिवासी बांधवांकडून सांगितले जात आहे.
घोटी : धरतीला मान्सूनची चाहुल लागली असून, काजव्यांच्या चकमक चंदेरी दुनियेने भंडारदरा परिसर उजळून निघाला आहे. येथील हिरडा, बेहडा, सादडा वृक्षांवर काजवे नृत्य करताना दिसत असून, या प्रकाशमयी तारकांचे आगमन म्हणजेच मान्सून आल्याचा संकेत असल्याचे आदिवासी बांधवांकडून सांगितले जात आहे.
काजव्यांचे भंडारदरा अभयारण्यात आगमन झाले असून, कळसूबाई, हरिश्चंद्र अभयारण्याच्या अनेक वृक्षराजींवर हे मनमोहक मायावी दुनियेने अधिराज्य गाजवत आहेत. संपूर्ण जंगल जणू रोषणाईने उजळल्याचे दृश्य नजरेस अनुभवयास येत आहे.
काजवामहोत्सवाचे भंडारदरा
येथील कळसूबाई व हरिश्चंद्रगड अभयारण्य, वन्यजीव विभागाने भंडारदरा येथे आयोजन केले आहे.हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा मोजक्याच झाडांवर काजव्यांचा काही दिवसांचाच ‘बसेरा’ असतो. आदिवासी खेड्यांच्या शिवारातली सहस्रावधी झाडे अक्षरश: कोट्यवधी काजव्यांनी लगडून गेली आहेत. ज्या विशिष्ट झाडांवर काजवे वस्तीला आलेले आहेत, ती झाडे सिमस ट्रीसारखी दिसताहेत ! झाडांच्या खोडांवर, फांद्यावर, पानांवर अगणित काजव्यांची आरास केली आहे. त्यांचे कित्येक भाईबंद झाडांभोवती पिंगा घालत आहेत. विशिष्ट पद्धतीने त्यांचा चमचमाट सुरू आहे. एका लयीत, तालात अन् सुरातही ! आपण बघितलं ते दृश्य आणखीन कोणाला दाखवण्याच्या हेतूने हातातले मोबाइल किंवा डिजिटल कॅमेरे फोटोसाठी पुढं सरसावतात. काजवे काही कॅमेऱ्यांना बधत नाहीत, ते काही केल्या जेरबंद होत नाहीत ! आम्हाला बघायचंय तर तुमचे डोळे हेच जगातले
उत्तम कॅमेरे आहेत, असेच जणू काजवे आपल्याला सांगताहेत. लखलख तेजाची ती चंदेरी दुनिया बघताना आपण धरणीवरचा स्वर्ग पाहात असल्याची भावना मात्र आपल्या मनाला आत आतपर्यंत सुखावत राहते...भंडारदºयाच्या वनामधील काजवामहोत्सव अनुभवण्यासाठी असंख्य निसर्गप्रेमी दाखल झाले असून, अनेक मोठमोठी हॉटेल्स सजली आहेत. आदिवासी पट्ट्यामध्येही बºयाच ठिकाणी स्वादिष्ट असे जेवण देण्यासाठी स्थानिक तरु ण सरसावले आहेत. ग्रामीण भागातील लोकनृत्याची कला ही या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ व नाशिक येथील ट्रॅव्हल्स असोसिएशनने या काजवा-प्रेमींंसाठी आयोजित केली आहे. भंडारदरा म्हटलं की, पर्यटकांना आठवण येते जलोत्सवाची. परंतु याच भंडारदºयाच्या निसर्गात अजूनही खूप काही दडलेले आहे याची पारख भंडारदºयाच्या वनविभागाने नेमकी हेरली. पावसाच्या आगमनाच्या अगोदर काजव्यांची मायावी दुनिया वनसाम्राज्यात कसे राज्य करते हे निसर्गप्रेमींच्या मनावर बिंबविले. काजव्यांचा हा निसर्गरूपी आविष्कार पुढे काजवामहोत्सव या नावाने उदयास आणला. या काजवारूपी प्रकाशफुलांचा जंगलामध्ये झाडावर चाललेला पाठशिवणीचा खेळ पाहण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक या प्रमुख शहरांसह संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर परराज्यातूनही अनेक निसर्गप्रेमी आसुसलेले आहेत.