जलयुक्तच्या निकषांवर आमदार नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:54 AM2017-07-20T00:54:37+5:302017-07-20T00:54:53+5:30

जलयुक्तच्या निकषांवर आमदार नाराज

Embarrassed on the hydrological criteria | जलयुक्तच्या निकषांवर आमदार नाराज

जलयुक्तच्या निकषांवर आमदार नाराज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बुधवारी जिल्ह्णातील आमदारांनी जलयुक्त शिवार योजनेचे निकष बदलण्याची जोरदार मागणी केली. ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनांच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले, त्याच गावांना उन्हाळ्यात पाणीटंचाई भासल्यामुळे केलेला खर्च वाया गेला असून, अलीकडेच या योजनेसाठी नव्याने काढण्यात आलेला आदेशही बदलण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
नियोजन समितीच्या बैठकीत आमदार नरहरी झिरवाळ, जिवा पांडू गावित, निर्मला गावित यांनी हा मुद्दा उपस्थित केला. झिरवाळ यांनी जलयुक्त शिवार योजनेसाठी गावांची निवड केली जाते परंतु नाशिक जिल्ह्णातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबक, इगतपुरी, दिंडोरी व कळवण या भागांची एकूणच भौगोलिक परिस्थिती पाहता याठिकाणी सिमेंटचे बंधारे बांधण्याजोगी भौगोलिक परिस्थिती नाही, त्यामुळे तेथे माती बंधारे योग्य आहेत परंतु अशा प्रकारची कामे करण्यास अधिकारी उत्सुक नाहीत. जलयुक्त शिवार योजनेची कामे सीएसआरमधून केली जातात, त्यासाठी निधीही खर्च केला जातो; मात्र त्याचा फारसा उपयोग होत नाही. या कामांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचे मत विचारात घेतल्यास त्याचा उपयोग होईल, असे सांगितले. आमदार निर्मला गावित यांनी जलयुक्तच्या निकषांमुळे आदिवासी भागातील गावे, पाड्यांंवर कामे होत नाही.
गेल्या वर्षात त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात काय कामे झाली याची माहिती अद्यापही आपल्याला दिली गेली नसल्याची तक्रार केली. जलयुक्त शिवार योजनेचे निकष बदलावेत यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार जिवा पांडू गावित यांनी, जिल्ह्णातील पश्चिम भाग खडकाळ व चढउताराचा असल्यामुळे या ठिकाणी जलयुक्तची कामे करूनही उपयोग नाही. जलयुक्तमध्ये एरिया ट्रीटमेंटला अधिक महत्त्व देण्यात आले असून, राज्यातील सपाट भूभागाचा विचार करून या योजनेचे निकष ठरविण्यात आले आहेत; मात्र जे भाग डोंगराळ व चढउताराचे आहेत तेथे ही योजना कशी राबविणार? असा सवाल त्यांनी केला.
नाशिकचे तत्कालीन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी अलीकडेच २३ जून रोजी जलयुक्त शिवार योजनेबाबत नवीन आदेश काढला आहे. त्या आदेशातील निकष व नियम पाहता आदिवासी भागात एकही काम होऊ शकणार नाही, त्यामुळे हा आदेश बदलण्यात यावा अशी मागणी केली. ज्या गावांमध्ये कामे केली तेथेच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Web Title: Embarrassed on the hydrological criteria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.