देवळा तालुक्यातील खालप सोसायटीत लाखोंचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 11:01 PM2020-08-05T23:01:24+5:302020-08-06T01:42:09+5:30

देवळा : तालुक्यातील खालप येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे सचिव व त्यांचे मदतनीस यांनी वैयक्तिक व संयुक्तरीत्या दैनंदिन कामकाजातील ५८ लाख ३६ हजार २४४ रु पयांचा अपहार करून फसवणूक केल्याचे लेखापरीक्षणात उघडकीस आल्याची माहिती सहाय्यक निबंधक सुजय पोटे यांनी दिली आहे. तशा आशयाची फिर्याद देवळा सहकारी संस्थेचे लेखापरीक्षक नवनाथ अर्जुन बोडके यांनी देवळा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

Embezzlement of lakhs in Khalap society in Deola taluka | देवळा तालुक्यातील खालप सोसायटीत लाखोंचा अपहार

देवळा तालुक्यातील खालप सोसायटीत लाखोंचा अपहार

Next
ठळक मुद्देलेखापरीक्षणात उघड : ५८ लाखांची फसणूक; पोलिसांत फिर्याद

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळा : तालुक्यातील खालप येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे सचिव व त्यांचे मदतनीस यांनी वैयक्तिक व संयुक्तरीत्या दैनंदिन कामकाजातील ५८ लाख ३६ हजार २४४ रु पयांचा अपहार करून फसवणूक केल्याचे लेखापरीक्षणात उघडकीस आल्याची माहिती सहाय्यक निबंधक सुजय पोटे यांनी दिली आहे. तशा आशयाची फिर्याद देवळा सहकारी संस्थेचे लेखापरीक्षक नवनाथ अर्जुन बोडके यांनी देवळा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, तालुक्यातील खालप येथील विविध कार्यकारी सोसायटीत १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१७ या मुदतीचे चाचणी लेखापरीक्षण जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक यांच्या आदेशानुसार लेखापरीक्षण केले असता अपहार झाल्याचे आढळून आले. सोसायटीच्या कर्जदार सभासदांचे खाती बोगस जमा नोंदी करून (४८,३९,६६३ रु.), वसुली रजिष्टरपेक्षा रोजकिर्दीस कमी रक्कम जमा करून (६,९१,५७३ रु.), जुनी खतावणीवरून नवीन खतावणी तयार करताना खाते बाकी कमी/निरंक करून (२,१९,९२८ रु.), वसुली रजिष्टर व रोजकिर्दीत असलेला जमा रकमेतील तफावत (९५,०८० रु.) असा एकूण ५८ लाख ३६ हजार २४४ रु पयांचा सचिव पोपट दगडू उशिरे व त्यांचे मदतनीस समाधान पंडित सूर्यवंशी यांनी संस्था, संस्थेचे सभासद, संस्थेचे संचालक मंडळ व कर्जदार यांची फसवणूक करून अपहार केला आहे. सोसायटीचे सचिव व त्यांचे मदतनीसावर देवळा पोलीस ठाण्यात फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.सहकारात खळबळ; तिसरी घटनालेखापरीक्षक नवनाथ बोडके यांनी तीन वर्षांपूर्वीखारीपाडा सोसायटीत ३६ लाख ६२ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे लेखापरीक्षणातून उघडकीस आणले होते. तीन वर्षांच्या कालावधीत आतापर्यंत खारीपाडा, सांगवी व खालप सोसायटीत अपहार झाल्यामुळे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होण्याची देवळा तालुक्यातील ही तिसरी घटना असल्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.संचालकांनी सोसायटीचे कामकाजाबाबत सजग राहून सभासदांचे हित जपले पाहिजे. सभासदांनी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी. सभासदांनी भरणा केलेल्या कर्जाच्या पावत्या मागून घ्याव्या व जपून ठेवाव्यात, सभासदांनी प्रत्येक आर्थिक वर्षात त्यांचे कर्ज खाते तपासून घ्यावे.
- सुजय पोटे, सहाय्यक निबंधक

Web Title: Embezzlement of lakhs in Khalap society in Deola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.