येवल्यात ३ कोटी ६९ लाख ६० हजारांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 12:45 AM2022-01-20T00:45:18+5:302022-01-20T00:45:18+5:30

येवला : गहाळ झालेल्या धनादेश पुस्तकातील चेक वटवून ३ कोटी ६९ लाख ६० हजार रुपयांचा अपहार करून पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Embezzlement of 3 crore 69 lakh 60 thousand in Yeola | येवल्यात ३ कोटी ६९ लाख ६० हजारांचा अपहार

येवल्यात ३ कोटी ६९ लाख ६० हजारांचा अपहार

Next
ठळक मुद्दे पाचजणांविरोधात ठकबाजीचा गुन्हा दाखल

येवला : गहाळ झालेल्या धनादेश पुस्तकातील चेक वटवून ३ कोटी ६९ लाख ६० हजार रुपयांचा अपहार करून पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
हर्षद सुभाषचंद्र पारख (रा. येवला) यांनी नाशिक जिल्हा सहकारी बँक येवला शाखा यांना पतसंसस्थेचे गहाळ झालेले चेक वटवू नये अगर व्यवहार करू नये असे लेखी कळविलेले होते. व्ही. एल. खैरनार, एम. एस. नागपुरे, ए. व्ही. कोकाटे, संदीप एम. जाधव, आर. पी. दराडे सर्व (रा. येवला) यांनी संगनमत व कटकारस्थान रचून ३ कोटी ६९ लाख ६० हजार रुपयांचे चेक वटवून देऊन पतसंस्थेची फसवणूक केली. हा प्रकार एप्रिल २०२० ते ८ मे २०२० दरम्यान घडला.
या संदर्भात पारख यांनी येवला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात दाखल क्रिमिनल चौकशी अर्ज क्रमांक २६२/२०२१ मध्ये सीआरपीसी कलम १५३,३ प्रमाणे न्यायालयाने आदेश मंजूर केला. याप्रकरणी एफआयआर नोंदवून व तपास करून अहवाल दाखल करावा बाबत न्यायालयाचे २२ डिसेंबर २०२१ रोजी पोलिसांना आदेश झाला होता.
ही कागदपत्र शहर पोलीस ठाण्यास प्राप्त झाल्याने मंगळवारी (दि. १८) व्ही. एल. खैरनार, एम. एस. नागपुरे, ए. व्ही. कोकाटे, संदीप एम. जाधव, आर. पी. दराडे (सर्व, रा. येवला) यांच्याविरुद्ध ठकबाजीचा गुन्हा दााखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे करीत आहेत.

Web Title: Embezzlement of 3 crore 69 lakh 60 thousand in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.