चालकाकडून मालासह लाखो रुपयांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 01:42 AM2022-06-23T01:42:44+5:302022-06-23T01:43:09+5:30
मोबाइल, रेडिमेड कपडे, भांडी, सायकली आदी विविध वस्तू नाशिक शहरातील दुकानात डिलिव्हरीसाठी दिल्या असताना त्यापैकी काही वस्तू स्वतःच्या जवळ ठेवून इतर वस्तू डिलिव्हरी करत त्यातून मिळालेली रक्कम परस्पर हडप करून विश्वासघात केल्याप्रकरणी म्हसरूळ बेलदारवाडी येथे राहणाऱ्या चालकावर म्हसरुळ पोलीस ठाण्यात विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी : मोबाइल, रेडिमेड कपडे, भांडी, सायकली आदी विविध वस्तू नाशिक शहरातील दुकानात डिलिव्हरीसाठी दिल्या असताना त्यापैकी काही वस्तू स्वतःच्या जवळ ठेवून इतर वस्तू डिलिव्हरी करत त्यातून मिळालेली रक्कम परस्पर हडप करून विश्वासघात केल्याप्रकरणी म्हसरूळ बेलदारवाडी येथे राहणाऱ्या चालकावर म्हसरुळ पोलीस ठाण्यात विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मखमलाबाद येथे राहणारे अंकित वासुदेव येशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, महेश मोहिते या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ दिवसांपूर्वी येशी यांनी त्यांच्या टाटा गोल्ड वाहनात क्रमांक (एमएच१५ एचएम ४७५१) दिंडोरी तालुक्यातील जऊळके येथे असलेल्या बाफना वेअर हाऊस येथून मोबाइल, सायकल भांडे, बूट, चपला असा ४ लाख ९० हजार ८८० रुपयांचा माल नाशिक शहरात डिलिव्हरी करण्यासाठी भरून दिला असता संशयित मोहिते याने या मालापैकी पावणेदोन लाख रुपयांचा माल स्वतःच्या घरात ठेवला व ३ लाख १६ हजार रुपयांचा माल डिलिव्हरी करून त्यातून मिळालेली रक्कम बँकेत भरणा न करता परस्पर हडप केली व पळून गेला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.