महात्मा फुले यांचे विचार अंगीकारावे : शोभा बच्छाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 11:57 PM2018-11-28T23:57:17+5:302018-11-29T00:21:22+5:30
महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी आहेत. प्रगत वाटचालीसाठी फुले यांचे विचार जीवनात अंगीकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांनी केले.
नाशिक : महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी आहेत. प्रगत वाटचालीसाठी फुले यांचे विचार जीवनात अंगीकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांनी केले. थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त माळी समाजसेवा समितीच्या वतीने परशुराम साईखेडकर सभागृहात समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात ५६ व्यक्तींना समाजभूषण पुरस्कराने गौरविण्यात आले. व्यासपिठावर अध्यक्षस्थानी सुनील फरांदे होते. प्रमुख पाहूणे म्हणून कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, पंचवटी सभापती प्रियंका माने, नगरसेवक संतोष गायकवाड, अनंता सूर्यवंशी, डॉ. दौलतराव गांगुर्डे, चंद्रकांत बागुल, बाळासाहेब जानमाळी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बच्छाव म्हणाल्या, समाजाला सुधारण्यासाठी फुले यांनी दिलेले योगदान हे न विसरता येणारे आहे. स्त्रियांना शिक्षणाची कवाडे सावित्रीबाई यांनी जोतिबा फुले यांच्या साथीने खुली करून दिली. सुशिक्षित व सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी त्यांनी आयुष्य वेचले. त्यांचे समाजकार्य हे नक्की आदर्श व प्रेरणादायी आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच आहेर यांनीही मनोगतातून फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांनी केले. सूत्रसंचालन योगेश कमोद यांनी केले.
यांचा झाला गौरव
विशेष सत्कारार्थी म्हणून गं. पां. माने, जी. जी. चव्हाण, सदाशिव माळी, बाजीराव तिडके आदींचा गौरव करण्यात आला. राजकीय : नगरसेवक समीना मेमन, सतीश खैरनार, मीनाक्षी कानडे, मालती गिते. शैक्षणिक गट : लक्ष्मण धोत्रे, निवृत्ती मंडलिक, अॅड. विनोद शेलार, जयंत बागुल, सचिन कळमकर. सामाजिक : छगनराव भंदुरे, सुनील वाडकर, राजेंद्र महाले, शंकर काठे, दीपक शेवाळे. पत्रकार : दत्तात्रय जाधव, दतात्रय शिंदे, शिक्षक : चंद्रकांत खैरनार, डॉ. मधुकर शिंदे. क्रीडा : लंकेश गाडेकर, समर माळी, कामिलभाई इनामदार आदी. आरोग्य- पर्यावरण : डॉ. गौरव खैरनार, देवांग जानी, डॉ. आबा पाटील, गुलाबराव माळी आदी. अधिकारी : रमेश शिंदे, गणेश फुलसुंदर, शरद सोमासे.
‘व्हय मी सावित्रीबाई’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
सोहळ्याच्या प्रारंभी सुषमा देशपांडे लिखित व सचिन शिंदे दिग्दर्शित ‘व्हय मी सावित्रीबाई’ या एकपात्री नाटकाचे सादरणीकरण करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न रंगमंचावर करण्यात आला. या नाटकात दामिनी जाधव यांनी सावित्रीबार्इंची भूमिका साकारली.