भोसला मिलिटरी स्कूलमध्ये आपत्कालीन अग्निशमनाचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:13 AM2021-04-06T04:13:56+5:302021-04-06T04:13:56+5:30
आपत्कालीन परिस्थितीत आग, महापूर, भूकंप अशा अनेक अडचणींना मानवाला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत जीवितहानी टाळण्याकरिता काय करावे हे ...
आपत्कालीन परिस्थितीत आग, महापूर, भूकंप अशा अनेक अडचणींना मानवाला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत जीवितहानी टाळण्याकरिता काय करावे हे बर्याचदा माहीत नसते यास्तव विद्यार्थ्यांना अग्निशमनाचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
सर्वप्रथम इ. १० वी व १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना समर्थ मैदान भोसला
मिलिटरी स्कूल यथे प्रात्यक्षिक व माहिती सुभेदार दीपक चव्हाण यांनी दिली. अचानक आग लागल्यावर काय करावे? तसेच त्याकरिता कोणते साहित्य वापरावे याचे प्रात्यक्षिक देताना अग्निरोधक नळकांड्या, वाळूचा, मातीचा, पाण्याचा त्याचबरोबर वेचा, छापा याचा वापर कसा करावा याची माहिती देण्यात आली.
त्यामध्ये शिडीचा वापर दोरीचा अचूक वापर कसा करावा याचा सराव विद्यार्थ्यांकरवी करण्यात आला. याकरिता सर्व सैनिकी प्रशिक्षक, शिक्षक शाळेचे समादेशक ब्रिगेडियर एम. एम. मसूर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य आर. जी. जगताप, मुख्य प्रशिक्षण अधिकारी कॅप्टन जितेंद्रकुमार मिश्रा गर्ल्स स्कूलच्या समादेशक मेजर शैलेजा रकीबे, प्राचार्य अंजली सक्सेना संतोष जगताप आदी उपस्थित होते. ( फोटो एनएसकेवर)