ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे संकटकाळी जनतेला मिळणार तात्काळ मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 05:54 PM2019-01-14T17:54:46+5:302019-01-14T17:57:12+5:30
पेठ : माहीती तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने नानाविध साधने बनविली मात्र अपत्कालीन परिस्थितीच्या वेळी तात्काळ मदत मिळण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा ही ...
पेठ : माहीती तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने नानाविध साधने बनविली मात्र अपत्कालीन परिस्थितीच्या वेळी तात्काळ मदत मिळण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा ही जगातील सर्वोत्तम संपर्कयंत्रणा विकसित करण्यात आली असून या यंत्रणेची सामान्य जनतेसह शासकिय विभागांना माहीती व्हावी यासाठी पेठ येथे तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.
तहसीलदार हरिष भामरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यशाळेत ग्रामसुरक्षा समन्वयक डी. के. गोर्डे यांनी या जलद संपर्कयंत्रणेबाबत माहीती दिली. आपत्कालीन स्थितीत ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्र मांकावर फोन केल्यास एकाच वेळी घटनास्थळाच्या परिसरातील अनेक लोकांना घटनेची माहीती अति तात्काळ कळवली जाईल. यामुळे ज्या ठिकाणी घटना घडली त्यांना मदत करणे सोपे जाणार आहे. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसुरक्षा यंत्रणा विकिसत करण्यात येणार असून चोरी, दरोडा, आग, अपहरण, छेडछाड, वाहन चोरी, आदी आपत्कालीन घटनांसाठी तत्काळ मदत मिळवता येणार आहे.
याप्रसंगी तहसीलदार हरिष भामरे, सभापती पुष्पा गवळी, तालुका कृषी अधिकारी शिलानाथ पवार, गटविकास अधिकारी अनिल नागणे, सहाय्यक गटविकास अधिकारी अमति भुसावरे, प्राचार्य आर. बी. टोचे, वनपाल आर.एस. आहेर यांचेसह तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, सुरक्षा रक्षक उपस्थित होते. एस. एल. शिंदे यांनी सुत्रसंचलन तर जी. एस. शेवाळे यांनी आभार मानले.
काय आहेत ग्रामसुरक्षा यंत्रणेचे वैशिष्टये
संपूर्ण गावात स्वयंचिलत यंत्रणा, संपूर्ण भारतात १८००२७०३६०० हा एकच टोल फ्री नंबर, यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात परिसरातील नागरिकांना एकाच कॉलद्वारे सावध करू शकतो, दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता,ठिकाण कळणार असल्याने विनाविलंब मदत मिळू शकते, नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलितरित्या प्रसारीत होतात, एका गावातून चोरी करून चोर दुसऱ्या गावाच्या दिशेने पळून गेल्यास त्या गावालाही संदेशाद्वारे सावध करता येते, सरकारी कार्यालये, पोलीस ठाणे आदींना त्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना सुचना देता येतात.
या कारणासाठी मिळू शकेल मदत
गंभीर अपघात, बिबट्याचा हल्ला, आग/ जळीत घटना, पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला, लहान मुल हरवणे, अपहरण, चोरी, दरोडा, विषबाधा, सर्पदंश, महिलांची छेडछाड, याबरोबर ग्रामपंचायत प्रशासनाला ग्रामसभा, घरपट्टी वसुली, सरकारी योजनांची माहीती, गॅस वाहन येणार असल्याची माहीती, रेशन-रॉकेल वितरण, पोलीओ लसिकरण, गरोदर माता तपासणी, शाळांचे कार्यक्र म, यात्रा सभा, आरोग्य शिबीरे, स्वच्छता अभियान आदी साठी वापर करता येऊ शकेल. पोलीस ठाणेतंर्गत येणाºया गावांना व पोलीस पाटलांना बैठकांचे संदेश, बंदोबस्त आदेश, चोरीच्या घटनेतील फरारी आरोपी आदींची माहीती देण्यासाठी या यंत्रणेचा वापर करून घेण्यात येणार आहे.