कॉँग्रेसने लादलेली आणीबाणी ही असहिष्णुताचसुब्रह्मण्यम स्वामी : माफी मागण्याची केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 01:25 AM2017-11-13T01:25:31+5:302017-11-13T01:28:50+5:30

देशात सत्तांतर झाल्यानंतर आता असहिष्णू वातावरण निर्माण झाल्याचा आरोप केला जात असला तरी कॉँग्रेसने आणीबाणी लागू करताना निरपराध १ लाख ४० हजार जणांना तुरुंगात टाकले ही असहिष्णुता नव्हती काय, असा प्रश्न भाजपाचे नेते खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केला आहे.

Emergency imposed by Congress: Intimidation by Subramanian Swamy: demand of apology | कॉँग्रेसने लादलेली आणीबाणी ही असहिष्णुताचसुब्रह्मण्यम स्वामी : माफी मागण्याची केली मागणी

कॉँग्रेसने लादलेली आणीबाणी ही असहिष्णुताचसुब्रह्मण्यम स्वामी : माफी मागण्याची केली मागणी

Next
ठळक मुद्दे‘असहिष्णुता : सत्य की आभास’ विषयावर व्याख्यान कॉँग्रेसने त्या असहिष्णुतेबद्दल माफी मागितली पाहिजेफौजदारी कायद्यांचे सर्रास उल्लंघन

नाशिक : देशात सत्तांतर झाल्यानंतर आता असहिष्णू वातावरण निर्माण झाल्याचा आरोप केला जात असला तरी कॉँग्रेसने आणीबाणी लागू करताना निरपराध १ लाख ४० हजार जणांना तुरुंगात टाकले ही असहिष्णुता नव्हती काय, असा प्रश्न भाजपाचे नेते खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केला आहे.
विवेक संवादच्या वतीने खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांचे ‘असहिष्णुता : सत्य की आभास’ या विषयावरील व्याख्यान शंकराचार्य संकुलात पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. आणीबाणीच्या काळात निरपराधांवर कारवाई करणाºया कॉँग्रेसने त्या असहिष्णुतेबद्दल माफी मागितली पाहिजे, असेही ते म्हणाले. देशात भाजपाचे सरकार आल्यानंतर एकदम असहिष्णू वातावरण निर्माण झाल्याचा आभास निर्माण केला जात आहे. देशात आपले काही चालत नाही, असे लक्षात आल्यानंतर कॉँग्रेसकडून अशाप्रकारे जाणीवपूर्वक पसरवले जात असल्याचा आरोप करून ते म्हणाले की, देशात आणीबाणी लागू करण्यात आल्यानंतर त्या विरुद्ध आवाज उठविणाºया १ लाख ४० हजार लोकांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. त्यासाठी फौजदारी कायद्यांचे सर्रास उल्लंघन करण्यात आले होते. मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्यावर गदा आणण्यात आली होती. अशा स्थितीत लोकशाहीसाठी लढा देणारा राष्टÑीय स्वयंसेवक संघ असहिष्णू कसा असू शकेल, असा प्रश्न त्यांनी केला. देशाला डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी राज्य घटना तयार करून दिली. या घटनेत आचारविचार आणि उच्चाराचे स्वातंत्र्य असले तरी याच घटनेत सार्वजनिक हिताचे रक्षण करण्यासाठी विधायक मर्यादादेखील आहे. देशाच्या अखंडतेसाठी घटनात्मक तरतुदीचा आधार घेऊनही अंकुश ठेवला जात असल्याचे सांगून असहिष्णुतेचे निमित्त करून मध्यंतरी पुरस्कार परत करण्याची लाटच आली होती. परंतु अशा लोकांनी पुरस्कार परत करताना त्यासाठी दिलेली रक्कम परत दिली नाही. मुळात या लोकांनी आणीबाणीच्या कालावधीत झालेल्या असहिष्णुतेसाठी कधी पुरस्कार का परत केले नाही, असा प्रश्न त्यांनी केला. या देशात सर्वप्रथम भाजपानेच मुस्लीम महिलांच्या तलाकचा प्रश्न सोडविला आणि त्यांना न्याय मिळवून दिला. त्यामुळेच उत्तर प्रदेशात झालेल्या निवडणुकीत एकही मुस्लीम समाजाचा उमेदवार न देताही या क्षेत्रातील १२५ पैकी ८५ जागा भाजपाला मिळाल्या. मुस्लीम समाजातील महिलांना न्याय देण्यासाठी न्यायालयात जाण्याचे धाडस सर्वप्रथम याच सरकारने दाखवल्याने हे शक्य झाले, असे सांगून त्यांनी भविष्यातही अशाप्रकारचे अनेक निर्णय सरकार घेणार आहे. विरोधकांच्या अल्पसंख्याकांना संघटित करण्यासाठी असहिष्णुतेचे वातावरण निर्माण करीत असले तरी भाजपाच्या धाडसी निर्णयांमुळे ते शक्य होणार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांचा नाशिककरांच्या वतीने मानपत्र देऊन महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक महेश पोहनेरकर यांनी केले. सूत्रसंचालन राहुल सोलापूरकर यांनी केले. व्यासपीठावर शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष डॉ. आशिष कुलकर्णी उपस्थित होते.
गांधी हत्येची लवकरच उकल
महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी नथुराम गोडसे यांच्यावर ठपका ठेवला गेला आहे. गोडसे याने दोनच गोळ्या गांधीजींवर झाडायच्या होत्या, असे नमूद केले होते. मग, गांधींच्या शरीरात बंदुकीच्या चार गोळ्या कुठून आल्या. सरकारी वकिलांच्या सांगण्यानुसार तीन गोळ्या गांधीजींच्या शरीरात होत्या, मग नेमक्या किती गोळ्या झाडल्या, याची उकल आता लवकरच होऊ शकेल असे सांगून सुब्रह्मण्यम स्वामी यांनी, गांधी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता बिर्ला मंदिरात नेण्यात आले. तेथे चाळीस मिनिटे गांधीजी जिवंत होते, मग त्यावेळी त्यांच्यावर उपचार का झाले नाहीत. इतकेच नव्हे तर गांधीजींच्या निधनानंतर शवविच्छेदनही करण्यात आले नाही, हे सर्व संशयास्पद होते. कोणत्याही घटनेमुळे फायदा कोणाचा याचा विचार करून तपास केला जातो. या खटल्यात असे का झाले नाही, असा प्रश्न त्यांनी केला.
पुरुषार्थानेच काश्मीर प्रश्न सुटेल
काश्मीर प्रश्न चर्चा करून सोडवला पाहिजे, असे सांगितले जाते. परंतु जे पाकिस्तानकडून पैसे घेतात अशा लोकांशी काय चर्चा करायची? नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांनी पाकव्याप्त काश्मीरही पुन्हा भारताच्या ताब्यात घेण्याचा ठराव केला आहे, त्यानुसार चर्चेपेक्षा पुरुषार्थानेच हा प्रश्न सुटेल, असेही खासदार सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले.
वल्लभभाई पटेल यांची कॉँग्रेसकडून उपेक्षाच...
कॉँग्रेसने सरदार वल्लभभाई पटेल यांची सातत्याने उपेक्षा केली. देशाची अखंडता जपण्यासाठी पाचशे राज्यांना देशात सामील करून घेणाºया पटेल यांची सातत्याने उपेक्षा केली. आम्ही पटेल यांचा वापर करून घेतला असे कॉँग्रेस म्हणते, मग कॉँग्रेसने त्यांची उपेक्षा का केली, त्यांना साधे भारतरत्न तरी का मिळू दिले नाही, असा प्रश्न खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केला.

Web Title: Emergency imposed by Congress: Intimidation by Subramanian Swamy: demand of apology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.