सिडको-अंबडला गणरायास भावपूर्ण निरोप
By admin | Published: September 28, 2015 10:49 PM2015-09-28T22:49:46+5:302015-09-28T22:51:02+5:30
सिडको-अंबडला गणरायास भावपूर्ण निरोप
सिडको : सिडको, तसेच अंबड परिसरात विघ्नहर्त्या गणरायास भावपूर्ण वातावरणात रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक मंडळांकडून निरोप देण्यात आला.
सिडको, अंबड परिसरात गणरायाच्या विसर्जनासाठी सकाळपासून सार्वजनिक मंडळांचे गणेशभक्त तयारीला लागले होते. यंदाच्या वर्षी गणेश मंडळांची संख्या कमी असली तरी उत्साह मोठ्या प्रमाणात दिसत होता. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही महापालिकेच्या वतीने गणेशमूर्ती दान करण्यासाठी ठिकठिकाणी व्यवस्था केली होती. गणरायाच्या विसर्जनासाठी दुपारी बारा वाजेपर्यंतचा मुहूर्त असल्याने बहुतांशी घरघुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने गणेशमूर्ती दान केले, तसेच काहींनी विसर्जन केले. परंतु दुपारी १२ वाजेनंतरही गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी दिसत होती.
ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात भावपूर्ण वातावरणात गणरायाचे विर्सजन करण्यात आले. अंबड येथील श्रीकृष्ण कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कामटवाडे येथील शिवशक्ती सामाजिक विकास संस्था, अंबड औद्योगिक वसाहतीतील डेल्टा मॅगनेट सार्वजनिक उत्सव, रायगड चौक येथील इच्छापूर्ती मित्रमंडळ, अंबड व स्वामीनगर येथील ओम महादेव मित्रमंडळ, कामटवाडे येथील कोकणभवन मित्रमंडळ आदिंनी मिरवणूक काढून गणरायास भावपूर्ण निरोप दिला, तर तुळजा भवानी चौक येथील सिद्धिविनायक मित्रमंडळ, तुळजा भवानी मित्रमंडळ, नवीन नाशिक मित्रमंडळ, राजे संभाजी मित्रमंडळ, गणेश चौक युवक मित्रमंडळ, एकता विविध
विकास सेवा संस्था, शिवराज कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ, शिवदुर्गा मित्रमंडळ, राजगड मित्रमंडळ, नटराज मित्रमंडळ यांसह शंभराहून अधिक लहान व मोठ्या मंडळांनी मिरवणूक न काढता आय.टी.आय. पूल, खुटवडनगर येथे गणेशमूर्ती दान, तर काहींनी विसर्जन केले.
आय.टी.आय. पूलसह अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, धनराज भोई यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)