कानुबाई मातेला भावपूर्ण निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:38 AM2017-08-01T00:38:07+5:302017-08-01T00:38:31+5:30

खान्देशवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या व नवसाला पावणाºया कानुबाई मातेला आज मिरवणूक काढत वाजत-गाजत भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. खान्देशातील आराध्य दैवत असलेल्या कानुबाई मातेचा सार्वजनिक उत्सव सिडको समितीच्या वतीने पारंपरिक वाद्यांच्या गजरात व अहिराणी भाषेतील गीतांच्या तालावर नृत्यात फुगड्यांचा फेर धरून परिसरातून वाजत-गाजत शोभा यात्रा काढण्यात आली.

The emotional message of Kanubai's mother | कानुबाई मातेला भावपूर्ण निरोप

कानुबाई मातेला भावपूर्ण निरोप

Next

सिडको : खान्देशवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या व नवसाला पावणाºया कानुबाई मातेला आज मिरवणूक काढत वाजत-गाजत भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. खान्देशातील आराध्य दैवत असलेल्या कानुबाई मातेचा सार्वजनिक उत्सव सिडको समितीच्या वतीने पारंपरिक वाद्यांच्या गजरात व अहिराणी भाषेतील गीतांच्या तालावर नृत्यात फुगड्यांचा फेर धरून परिसरातून वाजत-गाजत शोभा यात्रा काढण्यात आली. यावेळी वर्षभरासाठी कानुबाई मातेला निरोप देण्यात आला. उत्तमनगर बसथांबा येथे आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कानुबाई देवतेच्या जयजयकारात शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी अहिराणी गीतांच्या तालावर नगरसेवक नीलेश ठाकरे, मुकेश शहाणे तसेच नितीन माळी, रवि पाटील, सुरेश सोनवणे आदिंसह महिला मंडळाने ताल धरला होता. शोभायात्रा साईबाबानगर, महाकाली चौक, सावतानगर, पाटीलनगरमार्गे जगतापनगर येथे महालक्ष्मी मंदिर येथे विसर्जित करण्यात आली. यानंतर विधीवत पूजाअर्चा करून कानूबाई मातेला भावपूर्ण निरोप देण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक रत्नमाला राणे, छाया देवांग, भाग्यश्री ढोमसे, रश्मी हिरे, माजी नगरसेवक अनिल मटाले, अमोल पाटील, जगन पाटील, रामदास दातीर, राकेश ढोमसे, अतुल सानप, यशवंत नेरकर, अरुण वेताळ. हेमंत अहेर उत्सव समितीचे रवि पाटील, नितीन पाटील, सुरेश सोनवणे, रवींद्र पाटील, वसंत चौधरी, भगवान पाटील आदी सहभागी झाले होते.
..अन भाविक गहिवरले.
दरवर्षीप्रमाणे नवसाच्या कानुबाई मातेचा उत्सव सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षीही सिडको परिसरात हा उत्सव साजरा करण्यात आला. आज वर्षभरासाठी कानुबाई मातेला वाजत-गाजत कानुबाईची पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढत भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला यावेळी खान्देशी भाविकांसह उपस्थित महिलांना गहिवरून आले.




 

Web Title: The emotional message of Kanubai's mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.