निर्यातबंदीविरोधी आंदोलनांना जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 01:58 AM2020-09-17T01:58:25+5:302020-09-17T01:58:59+5:30

केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदी विरोधामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी दुसऱ्या दिवशीही आंदोलने करून केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, शिवसेना आणि स्वाभिमान शेतकरी संघटना यांच्यासह विविध संघटनांतर्फे ही आंदोलने झाली.

Emphasis on anti-export movements | निर्यातबंदीविरोधी आंदोलनांना जोर

दिंडोरीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्राच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Next
ठळक मुद्देजिल्हाभरात कांद्याचा प्रश्न पेटला : केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

नाशिक : केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदी विरोधामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी दुसऱ्या दिवशीही आंदोलने करून केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, शिवसेना आणि स्वाभिमान शेतकरी संघटना यांच्यासह विविध संघटनांतर्फे ही आंदोलने झाली. नांदगाव, निफाड, सटाणा, मालेगाव, न्यायडोंगरी, दिंडोरी व नाशिक शहरामध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.
केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे बळीराजा उद्ध्वस्त होणार आहे. बिहार राज्यातील आगामी निवडणुका लक्षात घेता केंद्राने घेतलेला हा निर्णय तातडीने मागे घेऊन, शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात येऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
कॉँग्रेसतर्फे निदर्शने
कांदा निर्यातबंदीचा घेतलेल्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात नाशिक शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (दि. १६) जोरदार निदर्शने करण्यात येऊन निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी करण्यात आली. कोरोना महामारी वाढत असताना हा निर्णय चुकीचा असल्याचा आरोप कॉँग्रेसने केला.
महिलाही उतरल्या रस्त्यावर
नाशिक शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने गळ्यात कांद्याच्या माळा घालून जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करून निर्यातबंदी मागे घ्यावी म्हणून आंदोलन केले. कांद्यावर पुन्हा निर्यातबंदी घोषित केली यामुळे शेतकरी देशोधडीला लागेल, असा आरोप महिला कार्यकर्त्यांनी केला आहे. जगाच्या पोशिंद्याला न्याय देण्याची मागणी महिला कार्यकर्त्यांनी यावेळी केली.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध केला. पुणे, धुळे, कोल्हापूर, रत्नागिरी, ठाणे, परभणी, औरंगाबाद, सोलापूरसह सर्व जिल्हा मुख्यालये व तालुका स्तरावर काँग्रेसने आंदोलन करुन केंद्र सरकारचा निषेध केला. शेतकरी संघटना, काँग्रेस आणि शिवसेना त्यात सहभागी झाले होते.
दर गडगडले
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी बंद पडलेले कांदा लिलाव पूर्ववत सुरू होऊन ६९७ वाहनातील ९०४४ क्विंटल उन्हाळ कांदा १००० ते २९५१ रुपये, सरासरी भाव २४७० रुपये होते, तर काल लिलाव बंद झाल्याने सहा वाहनातील ८२ क्विंटल कांदा १२८० ते २२०० रुपये भावाने विक्री झाला होता.

Web Title: Emphasis on anti-export movements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.