सिडको भागात अवैध धंद्यांना जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:12 AM2021-05-28T04:12:36+5:302021-05-28T04:12:36+5:30

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिडकोतील दत्त चौक, त्रिमूर्ती चौक, खुटवडनगर, साळुंकेनगर, दातीर मळा यांसह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून ...

Emphasis on illegal trades in CIDCO area | सिडको भागात अवैध धंद्यांना जोर

सिडको भागात अवैध धंद्यांना जोर

googlenewsNext

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिडकोतील दत्त चौक, त्रिमूर्ती चौक, खुटवडनगर, साळुंकेनगर, दातीर मळा यांसह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंदे जोमाने सुरू आहे. परंतु असे असले तरी याबाबत अंबड पोलीस ठाण्याच्या सुभेदारांनी याठिकाणी कारवाई केली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून कायम वर्दळ असलेल्या त्रिमूर्ती चौक या ठिकाणी जुगार अड्डा सुरू होता.

गेल्या काही महिन्यांपूर्वी सदरचा जुगार अड्डा पोलिसांनी बंद केला होता. परंतु यानंतर काही दिवसांनी हा जुगार अड्डा पुन्हां पोलिसांच्या वरदहस्ताने सुरूच होता. परंतु गुरुवारी हा जुगार अड्डा सील केल्याचे समजते. विशेष म्हणजे या जुगार अड्ड्याजवळच काही अंतरावरच संचारबंदीसाठी रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी चोवीस तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे . याच ठिकाणी हाकेच्या अंतरावर हा जुगार अड्डा सुरू असताना देखील पोलिसांनी याकडे डोळेझाक केली का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जुगाराबाबत पोलीस उपायुक्त विजय खरात यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी जुगार अड्डा सुरू असेल तर कारवाई करू, असे सांगितले.

---

फोटो आर वर २७सिडको१/२

===Photopath===

270521\27nsk_26_27052021_13.jpg

===Caption===

जुगार अड्डयावर छापा

Web Title: Emphasis on illegal trades in CIDCO area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.