त्र्यंबकला हरित ‘ब्रम्हगिरी' साकारण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 11:51 PM2020-10-12T23:51:59+5:302020-10-13T01:45:42+5:30

त्र्यंबकेश्वर : येथील ब्रह्मगिरी पर्वतावरील परिसर हरित करण्यासाठी आयपीएल ग्रुपतर्फे प्रयत्न करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन झाडा झुडपा अभावी ब्रम्हगिरी पर्वत उजाड झाला होता. यासाठी पवर्तावर झाडाझुडपांसह फुले वेली नी युक्त हरित ब्रम्हगिरी करणारच असा ध्यास घेतलेले आयपीएल ग्रुपचे प्रमुख ललित लोहगाव कर यांनी सांगितले. लाखो लोकांचे श्रद्धास्थान असणारा शिवस्वरुप ब्रम्हगिरी गेल्या काही वर्षांपासून त्यावरील वृक्ष वेली नाहिसे होउन अक्षरश: उघडा बोडका झाला होता. अनेकांनी वृक्ष राजी तोडली होती.

Emphasis on making Trimbakla a green 'Bramhagiri' | त्र्यंबकला हरित ‘ब्रम्हगिरी' साकारण्यावर भर

त्र्यंबकला हरित ‘ब्रम्हगिरी' साकारण्यावर भर

Next
ठळक मुद्देआयपीएलचा ग्रु्रपचा उपक्रम: पर्वतावरील पडक्या विहरींची दुरूस्ती करून स्वच्छता

त्र्यंबकेश्वर : येथील ब्रह्मगिरी पर्वतावरील परिसर हरित करण्यासाठी आयपीएल ग्रुपतर्फे प्रयत्न करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन झाडा झुडपा अभावी ब्रम्हगिरी पर्वत उजाड झाला होता. यासाठी पवर्तावर झाडाझुडपांसह फुले वेली नी युक्त हरित ब्रम्हगिरी करणारच असा ध्यास घेतलेले आयपीएल ग्रुपचे प्रमुख ललित लोहगाव कर यांनी सांगितले. लाखो लोकांचे श्रद्धास्थान असणारा शिवस्वरुप ब्रम्हगिरी गेल्या काही वर्षांपासून त्यावरील वृक्ष वेली नाहिसे होउन अक्षरश: उघडा बोडका झाला होता. अनेकांनी वृक्ष राजी तोडली होती. पावसाअभावी पवर्तावर झाड वनराई नष्ट झाली होती. डोंगर परिसरात सर्वत्र प्लॅस्टीक कचरा रद्दी कागद प्लॅस्टिकच्या पिशव्यामुळे घाण साचली होती. यातील काही कचरा न.पा.जलाशयात साचत असे. यामुळे संपुर्ण ब्रम्हगिरी गंगाद्वार परिसरात प्रदुषण झाले होते. झाडे वनस्पती नसल्याने पावसाचे प्रमाण कमी झाले होते. पर्यावरण नष्ट झाले होते. लोहगावकर यांच्या ग्रुपमध्ये वकील इंजिनिअर डॉक्टर पालिका कमर्चारी हॉटेल किराणा व्यावसायिक आदी सर्व प्रकारची युवा मंडळी आहेत. या सर्वांना स्वच्छ ब्रम्हगिरी सुंदर ब्रम्हगिरी व हरित ब्रम्हगिरी या ध्यासाने पछाडले आहे. ब्रम्हगिरी चढण्याचा प्रारंभ करण्यापासुन ते वरपर्यंत केवळ पाय-याच नव्हे तर परिसर स्वच्छ करण्याची कामगिरी वारंवार करत असतात. ब्रम्हगिरी गंगाद्वार वाटेवरील जुन्या पडक्या विहीरी दुरुस्त करून उपसुन स्वच्छ करण्याचे काम या ग्रुपने केले. 


आयपीएल ग्रुपला सहकार्य करणारे डॉक्टर्स नाशिकचे डॉक्टर्स सेवाभावी संस्था गडकिल्ल्यावर ट्रेकींग करणारे लोक अधुन मधुन स्वच्छता वृक्षारोपण वगैरे करतात.पण या ग्रुपचे लोक वनविभागाच्या मदतीने ठिकठिकाणी वृक्षारोपण औषधी वनस्पतींची झाडे विविध फुलांची झाडे या मध्ये वड पिंपळ औदुंबर (उंबर) आंबा जांभुळ पेरु फणस बकुळ चिंच विलायतीचिंच बोरं तर औषधी वनस्पती हिरडा अर्जुन सादडा करंजी सोनचाफा आदी ५०० वृक्षांची रोपे आणण्यात आली. तर ज्या फुलांना राज्य पुष्प म्हणुन संबोधतात त्या ताम्हणाचे फुलाची १५०० रोपे आणण्यात येउन ब्रम्हगिरी माथा दोन्ही पवर्ताचा वर पासुन खाली अशा सर्व परिसरात लावण्यात आलेले आहे. याशिवाय पाय-यांची डागडुजी झाडांना ओटे, पार बांधण्यात आले आहेत.

Web Title: Emphasis on making Trimbakla a green 'Bramhagiri'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.