मोठ्या प्रकल्पांपेक्षा समस्यामुक्तीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:47 AM2019-11-24T00:47:32+5:302019-11-24T00:47:50+5:30

नाशिक शहर झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे विकासाच्या अपेक्षा खूपच वाढल्या आहेत. शहरातील विकास करण्याबरोबरच नाशिकमध्ये नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या समस्या सोडविण्यावर लक्ष देण्यात येणार आहे, अशी माहिती नाशिकचे नवनिर्वाचित महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली. महापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्व प्रथम ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी मनातील कल्पना सांगितल्या.

 Emphasis on problem-solving than on larger projects | मोठ्या प्रकल्पांपेक्षा समस्यामुक्तीवर भर

मोठ्या प्रकल्पांपेक्षा समस्यामुक्तीवर भर

Next

प्रश्न : महापौर म्हणून निवडून आल्यानंतर तुमच्यासमोर कोणती आव्हानं आहे?
कुलकर्णी : शहर प्रचंड वाढते आहे. त्यामुळे महापालिकेची जबाबदारी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच महापालिकेच्या अनेक मर्यादा आहेत. उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित आहेत. नागरिकांना तोषीस लागू न देता महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याची गरज आहे. मनुष्यबळाची प्रचंड कमतरता आहे. त्याचा परिणाम नागरी कामांवर होतो. नागरिकांना मूलभूत समस्या सोडविण्यात अडचणी येतात. आज महापालिकेत अनेक मोठे प्रकल्प सुरू आहेत आणि सुरूच राहतील, परंतु नागरिकांच्या दैनंदिन समस्या सुटण्याचे मोठे आव्हान आहे.
महापौर म्हणून शहरातील कोणत्या प्रश्नांना प्राधान्य असेल?
कुलकर्णी : नाशिक शहरात स्वच्छतेची समस्या मोठी आहे. आज शहरात डेंग्यू किंवा अनेक आजार होत आहेत. त्यामुळे अस्वच्छता हे मुख्य कारण आहे. यापूर्वी मी साडेचारशे ब्लॅक स्पॉट नष्ट केले होते. मात्र पुन्हा ते सुरू झाले. शहरात ६० टक्के भागांत स्वच्छता होत नाही. त्याचा विचार करण्याची गरज आहे. एकट्या आरोग्याधिकाऱ्याकडून काम होत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची पुनर्रचना केली जाईल. नाशिकचे सिंगापूर किंंवा असे अन्य काही प्रकल्प राबविण्यास दुय्यम स्थान आधी नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्रारंभ दिले जाईल. त्याचप्रमाणे फाळके स्मारकासह बंद अवस्थेत असलेले प्रकल्प सुरु करण्यात येतील.
नगरसेवकांची कामे महत्त्वाची
गेल्या तीन वर्षांत अनेक प्रशासकीय अडचणी आल्या. त्यातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नगरसेवकांची अनेक कामे रखडली आहेत नगरसेवकांनी कामांच्या याद्या देऊनदेखील अंदाजपत्रकातील आर्थिक मर्यादेमुळे कामे होऊ शकलेली नाहीत. आता उत्पन्न वाढवून येत्या दोन वर्षांत नगरसेवकांनी सुचविलेली नागरी कामे कशी करता येतील यावर भर देणार आहे.
तज्ज्ञांचा सल्ला घेणार
शहरातील अनेक लहान मोठे प्रकल्प होत आहेत. मुख्यमंत्र्यांचे ड्रीम प्रोजेक्ट असतील, ते पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यात शहरात चांगले प्रयोग साकारण्यासाठी मान्यवरांचा सल्लादेखील घेतला जाईल.

Web Title:  Emphasis on problem-solving than on larger projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.