राजापूरला कांदा साठवणुकीवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 10:49 PM2020-04-20T22:49:59+5:302020-04-20T22:50:27+5:30
राजापूर परिसरात उन्हाळ कांदा काढण्याची लगबग दिसून येत आहे. उन्हाळ कांद्याला सध्या चारशे ते पाचशे रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे कांदा साठवणुकीला पसंती दिली आहे.
राजापूर : परिसरात उन्हाळ कांदा काढण्याची लगबग दिसून येत आहे. उन्हाळ कांद्याला सध्या चारशे ते पाचशे रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे कांदा साठवणुकीला पसंती दिली आहे.
सध्या उन्हाळ कांदा काढणीचे काम सुरू असून कमी बाजारभावात विकण्यापेक्षा शेतकरी कांदा साठवणूक करणे पसंत करत आहे. कांदा पिकासाठी लागणारा खर्च, मजुरीचा खर्च याचा विचार केला तर आत्ताच्या बाजारभावात झालेला खर्चही वसूल होत नाही. साठवणूक करूनही कांदा किती दिवस टिकणार हा प्रश्नच आहे. शेतकरी हमीभाव मिळण्याच्या अपेक्षेने साठवणुकीवर भर देत आहेत.
सध्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी कांदा साठवणूक करत आहेत. सध्याच्या बाजारभावात झालेला खर्चही वसूल होणार नाही. कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला अशी प्रतिक्रिया शेतकरी माधव अलगट यांनी दिली.