बाजार समितीत अंधाराचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 12:55 AM2019-12-17T00:55:56+5:302019-12-17T00:56:32+5:30
उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठी बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या अनेक महिन्यांपासून बाजार समितीने बसविलेले पथदीप बंद असल्याने दैनंदिन सायंकाळच्या सुमाराला परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. बाजार समितीतील बंद पथदीपांमुळे शेतकरी, व्यापारी त्रस्त झाले आहेत.
पंचवटी : उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठी बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या अनेक महिन्यांपासून बाजार समितीने बसविलेले पथदीप बंद असल्याने दैनंदिन सायंकाळच्या सुमाराला परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. बाजार समितीतील बंद पथदीपांमुळे शेतकरी, व्यापारी त्रस्त झाले आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून मुख्य आवारातील पथदीप बंद असल्याने ते सुरू करावेत, अशी मागणी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी तसेच खुद्द संचालकांनी बाजार समितीकडे केल्यानंतरदेखील बाजार समितीचे दुर्लक्ष होत असल्याने सध्यातरी पथदीप प्रश्न प्रलंबितच आहे. बाजार समितीत दैनंदिन कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. शेकडो शेतकरी शेतमाल विक्रीसाठी सायंकाळी येतात. गेल्या काही दिवसांपूर्वी व्यापारी व शेतकºयांचे पैसे लुटल्याची घटना उघडकीस आली होती. सध्या सायंकाळी लिलाव होणाºया पटांगणातील अनेक पथदीप बंद असल्याने बाजार समितीत अंधाराचे साम्राज्य पसरत आहे.
चोरीच्या घटना
अनेक व्यापारी, आडत्यांनी आपापल्या व्हेजिटेबल कंपनीच्या बाहेर स्वखर्चाने विद्युत व्यवस्था केली आहे. बाजार समितीतील मुख्य आवारातील पथदीप बंद असल्याने शेतकºयांचा शेतमाल, पैसे, मोबाइल चोरणे यांसारख्या घटना घडण्याची दाट शक्यता असल्याने बाजार समिती प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन बंद पथदीप सुरू करावे, अशी मागणी शेतकरी, व्यापाºयांनी आणि काही संचालकांनी केली आहे.