डुबेरे नाक्याजवळ खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 11:10 PM2019-11-14T23:10:14+5:302019-11-14T23:10:45+5:30

सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर डुबेरे नाक्याजवळ नवजीवन डे स्कूल परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, हे खड्डे अपघाताना निमंत्रण देत आहेत. जीवघेणे खड्डे कधी बुजविणार असा प्रश्न वाहनधारक व प्रवाशांना पडला आहे.

Empire of pits near the nub of the Dubere | डुबेरे नाक्याजवळ खड्ड्यांचे साम्राज्य

सिन्नर-घोटी महामार्गावर डुबेरे नाक्याजवळ रस्त्यावर पडलेले खड्डे.

googlenewsNext
ठळक मुद्देसिन्नर-घोटी महामार्ग : वाहनचालक त्रस्त; रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर डुबेरे नाक्याजवळ नवजीवन डे स्कूल परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, हे खड्डे अपघाताना निमंत्रण देत आहेत. जीवघेणे खड्डे कधी बुजविणार असा प्रश्न वाहनधारक व प्रवाशांना पडला आहे.
सिन्नर-घोटी महामार्ग हा रहदारीचा रस्ता आहे. मोठ मोठ्या वाहनांची वर्दळ या रस्त्यावरून असते. चौफुलीच्या ठिकाणी पावसाच्या पाण्याने डांबरी रस्ता उखडला असून, रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मोठ्या वाहनांच्या वर्दळीने मोटारसायकलस्वारांना कसरत करतच या खड्ड्यांजवळून रस्ता पार करावा लागतो.
सध्या हे खड्डे अपघाताना निमंत्रण देत आहे. रात्री गाड्यांच्या लाइटचा डोळ्यावर पडणाऱ्या प्रकाशामुळे खड्डे लक्षात येत नसल्याने अनेक मोटारसायकलस्वार या ठिकाणी घसरून जखमी झाले आहेत. अनेकांच्या पाठीच्या दुखापतीलाही हे खड्डे कारणीभूत ठरत असून, खड्ड्यांचा आकार दिवसेंदिवस मोठा होत आहे. सध्या किरकोळ अपघताना निमंत्रण देणारे हे खड्डे जीवघेणे ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी वाहनधारकांसह प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
या भागात डांबरी रस्ता उखडून नेहमीच खड्डे पडत असतात. मोटारसायकलस्वारांना कसरत करतच तेथून आपली मोटारसायकली काढाव्या लागतात. अनेकदा अपघातही घडतात. सद्यस्थितीत पडलेले खड्डे दुचाकी वाहनचालकांसाठी घातक ठरतील असेच आहे. त्यामुळे हे खड्डे तातडीने बुजविणे आवश्यक आहे.प्रवासी घेऊन वाहने चालविताना खड्ड्यांच्या ठिकाणी मोठी कसरत करावी लागते. कधी कधी अपघाताचा धोकाही संभवतो. खड्ड्यांचा आकार वाढू लागल्याने वाहन चालविणे जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे हे खड्डे बुजविणे आवश्यक आहे.
- अण्णा ढोली, रिक्षाचालकरस्त्यावरी खड्डे वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. यावर उपाययोजना होणे अपेक्षित आहे. या खड्ड्यांनी एखाद्याचा जीव घेण्यापूर्वीच ते बुजले पाहिजेत. मोठ्या वाहनांच्या वर्दळीत मोटारसायकलस्वार जीव मुठीत घेऊन आपली वाहने रस्ता पार करीत असतात. त्यावेळी अपघाताचा धोकाही संभवतो. हे खड्डे बुजले तर मोठी वाहने याठिकाणी थबकणार नाहीत व मोटारसायकलस्वार आपली वाहनेही विनाअडथळा तेथून घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे हे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने बुजवावेत.
- ज्ञानेश्वर ढोली, सामाजिक कार्यकर्ते

 

Web Title: Empire of pits near the nub of the Dubere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.