कर्षण कारखाण्याच्या प्रकल्प ग्रस्तांना नोकरीत सामावून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 11:54 PM2020-08-25T23:54:17+5:302020-08-26T01:10:49+5:30

नाशिकरोड : कर्षण मशिन कारखान्यासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना कारखान्यामध्ये नोकरीत सामावून घेण्यात यावे या मागणाचे निवेदन कारखाना व्यवस्थापक एम.सी. चौधरी यांना देण्यात आले.

Employ traction factory project victims | कर्षण कारखाण्याच्या प्रकल्प ग्रस्तांना नोकरीत सामावून घ्या

कर्षण कारखाण्याच्या प्रकल्प ग्रस्तांना नोकरीत सामावून घ्या

Next
ठळक मुद्देप्रकल्प ग्रस्त शेतकरी वारसांची मागणी

नाशिकरोड : कर्षण मशिन कारखान्यासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना कारखान्यामध्ये नोकरीत सामावून घेण्यात यावे या मागणाचे निवेदन कारखाना व्यवस्थापक एम.सी. चौधरी यांना देण्यात आले.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले की, चांंडेगाव, चेहेडी, देवळालीगाव शिवारातील जमीनी कर्षण मशीन कारखान्यासाठी संपादित करण्यात आलेल्या आहेत. ३५ वर्षेहुन स्थानिकांना नोकरी मिळालेली नाही. सन १९८३ साली तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री मधु दंडवते यांनी चाडेगाव, चेहेडी, देवळालीगाव शिवारातील २५० एकर जमीन संपादित केली. रेल्वेचा कर्षण मशीन कारखाना उभारला त्यावेळी रेल्वे मंत्री दंडवते यांनी जमिनी संपादित झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. कारखाना सुरू होऊन ३५ वर्षे झाली मात्र अद्यापपर्यंत प्रकल्पग्रस्त वारसांना नोकरी मिळाली नाही. आता कारखान्यात ठेकेदार पध्दतीने भरती चालू आहे. सदर कारखान्यांमध्ये नोकरीसाठी बाहेरील जिल्ह्णातील व राज्यातील तरुणांना नोकरी देऊ नये. त्याठिकाणी नोकरी स्थानिक व प्रकल्प ग्रस्तांच्या वारसांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात यावी. ठेकेदार पध्दत बंद करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर नगरसेवक पंडित आवारे, नगरसेविका जयश्री खर्जुल, गोरख खर्जुल, कचरू नागरे, सुनिल सोनवणे, रवि आस्वले आदींंच्या सह्या आहेत .

Web Title: Employ traction factory project victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.