रोपवाटिकेच्या माध्यमातून दिला १०० मजुरांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 09:19 PM2020-07-14T21:19:29+5:302020-07-15T01:13:17+5:30
एकलहरे : शेतीला पूरक म्हणून सुरू केलेल्या रोपवाटिकेच्या माध्यमातून स्वत:ची प्रगती साधण्याबरोबरच परिसरातील १०० गरजूंना राजगार उपलब्ध करून देण्याची किमया दोनवाडे येथील बबनराव कांगणे यांनी साधली आहे.
एकलहरे : ( शरदचंद्र खैरनार) शेतीला पूरक म्हणून सुरू केलेल्या रोपवाटिकेच्या माध्यमातून स्वत:ची प्रगती साधण्याबरोबरच परिसरातील १०० गरजूंना राजगार उपलब्ध करून देण्याची किमया दोनवाडे येथील बबनराव कांगणे यांनी साधली आहे.
कांगणे यांची दोनवाडे येथे वडिलोपार्जित शेती आहे. शेतीला घरचे मनुष्यबळ अत्यावश्यक असल्याने नाशिक कारखान्याची चांगली नोकरी सोडून त्यांनी आधुनिक शेतीची कास धरली. आपल्याबरोबरच इतरांनाही रोजगार मिळेल या उद्देशाने रोपवाटिका सुरू करण्याचा निर्णय घेतला. दोनवाडे येथे पहिली रोपवाटिका सुरू केली. भगूर, लहवित, दोनवाडे परिसरांतील शेतकरी वेगवेगळ्या रोपांची मागणी नोंदवू लागले. तेथे चांगला जम बसला. त्यामुळे हिंगणवेढे-गंगापाडळी शिवारात हायवेलगत तीन एकर जागेवर सर्व सोयींनी युक्त, अत्याधुनिक मशिनरी व तंत्रज्ञानाचा वापर करून नर्सरीची सुरु वात केली. उसाची एकडोळा पद्धतीचे संशोधन करून मशीनच्या सहाय्याने लागवड करण्याचे तंत्र विकसित केले.