भारम आरोग्य केंद्रांसाठी कर्मचारी आकृतिबंध

By admin | Published: January 5, 2017 01:42 AM2017-01-05T01:42:47+5:302017-01-05T01:43:20+5:30

येवला : नवीन इमारतींच्या लोकार्पणाचा मार्ग मोकळा

Employee Disclosure for Bharams Health Centers | भारम आरोग्य केंद्रांसाठी कर्मचारी आकृतिबंध

भारम आरोग्य केंद्रांसाठी कर्मचारी आकृतिबंध

Next

  येवला : तालुक्यातील भारम प्राथमिक आरोग्य केंद्रासह खिर्डीसाठे व भुलेगाव या उपकेंद्रासाठी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांचा आकृतिबंध राज्य शासनाने मंजूर केल्याने येथील नवीन इमारतींच्या लोकार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या वर्षभरापासून भारम येथे प्राथमिक आरोग्य केंद्र तर खिर्डीसाठे व भुलेगाव येथे उपकेंद्रांच्या इमारती बांधून पूर्ण झालेल्या होत्या. मात्र या आरोग्य संस्थाकरिता वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदांचा आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी प्रलंबित होता. त्यामुळे इमारतींचे बांधकाम पूर्ण होवूनही या आरोग्य संस्था कार्यान्वित झालेल्या नव्हत्या. पदांचा आकृतिबंध शासनाने मंजूर न केल्यामुळे कोट्यावधी रु पयांच्या सुसज्ज इमारती विनावापर पडून होत्या. आमदार छगन भुजबळ यांनी याकामी लक्ष घालून पदांचा आकृतिबंध मंजुरीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे शासनाने भारम येथे दोन वैद्यकीय अधिकारी यासह इतर सात तांत्रिक तर पाच अतांत्रिक याप्रमाणे १२ पदांना तसेच आरोग्य संस्थासाठी साधन सामुग्री करिता आवर्ती व अनावर्ती तसेच खिर्डीसाठे व भुलेगाव येथे प्रत्येकी एक स्त्री व पुरु ष आरोग्य कर्मचारी आणि अंशकालीन स्त्री परिचर यासह आवर्ती व अनावर्ती खर्चाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारम, खिर्डीसाठे व भुलेगाव येथील आरोग्य संस्थाचे उद्घाटन करून या संस्था कार्यान्वित करण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे लवकरच या संस्थांचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे बाळासाहेब लोखंडे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Employee Disclosure for Bharams Health Centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.