डेपो एकमधील कामगारांना अधिकाऱ्यांचे अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:27 AM2019-03-27T00:27:12+5:302019-03-27T00:27:35+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या विविध विभाग आणि डेपोंमध्ये वरिष्ठांच्या जागांवर कनिष्ठ कामगार काम करीत असून, याचा सर्वाधिक फटका डेपो क्रमांक एकमधील कर्मचाऱ्यांना बसत असल्याची चर्चा आहे.
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या विविध विभाग आणि डेपोंमध्ये वरिष्ठांच्या जागांवर कनिष्ठ कामगार काम करीत असून, याचा सर्वाधिक फटका डेपो क्रमांक एकमधील कर्मचाऱ्यांना बसत असल्याची चर्चा आहे. कामगारांच्या राजकीय हालचालींचे केंद्र असल्यामुळे या डेपोतील काराभाराकडे अधिकारीही काणाडोळा करीत असल्याचा फायदा वरिष्ठांच्या खुर्चीवर बसलेले कामगार घेत आहेत. दरम्यान, याप्रकरणी महामंडळाने अशा कर्मचाऱ्यांचा शोध सुरू केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या डेपो स्तरावर अनेक कर्मचारी हे असलेल्या जबाबदारी व्यतिरिक्त अन्य ठिकाणी कामे करीत असल्याची बाब समोर आली आहे. संबंधित कर्मचारी अधिकारी असल्याचे भासवत इतर कर्मचाºयांना वेठीस धरू लागल्यानंतर याबाबतची तक्रार वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोहोचल्याने या प्रकरणाचे गांभीर्य समोर आले आहे. त्यानुसार आता अशा कर्मचाºयांची माहिती मिळविली जात असून, कोणत्या जागांवर किती कर्मचारी काम करीत आहेत, याची माहिती घेतली जात आहे.
नाशिक डेपो-१ मध्ये अधिकारी भासविणाºया कर्मचाºयांकडून होणारा उपद्रव आणि त्यामुळे इतर कर्मचाºयांना येणारा कामाचा ताण यामुळे अनेकदा पीडित कर्मचाºयांनी तक्रारी नोंदविलेल्या आहेत. तात्पुरत्या चौकशी आणि नोंदी घेण्यात आल्या; मात्र नेत्यांच्या दबावामुळे अशा कर्मचाºयांवर कोणतीही कारवाई आजवर होऊ शकलेली नाही. कोणताही अधिकार नसतानाही संपूर्ण डेपोवर अधिकार गाजविण्याºया काही कर्मचाºयांमुळे इतर कर्मचारी भयभीत असल्याचे येथील एका वरिष्ठ कामगार प्रतिनिधीने अधिकाºयांकडे तक्रार केलेली आहे. मात्र, अजूनही कारवाई होत नसल्याने संबंधित कर्मचारी डेपोवर वर्चस्व राखून आहे़
वरिष्ठ नसतानाही खालच्या कामगारांवर अरेरावी
महामंडळाच्या नाशिक डेपोच्या कारभाराविषयीच्या अनेक तक्रारी असून, अगदी कर्मचाºयांची वर्तणूक ते चोरीच्या घटनांमुळे डेपोंचा कारभार नेहमीच चर्चेत राहिला आहे. येथील सुरक्षा आणि दक्षता विभागाकडून अनेकदा गैरप्रकार प्रकरणी जाबजबाब नोंदविण्यात आले असून, काही गंभीर प्रकरणी पोलिसांनादेखील पाचारण करावे लागलेले आहे. त्यामुळे डेपोंचा कारभार नेहमीच संशयाच्या भोवºयात राहिला आहे. आता अधिकारी या गैरप्रकारांना कसा आळा घालतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.