मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा घाट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:38 AM2019-06-23T00:38:05+5:302019-06-23T00:38:39+5:30
नाशिक बाजार समितीच्या ई-नाम कामकाजासाठी कंत्राटी पद्धतीने सहा महिन्यांसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना मागच्या दाराने कायम करण्याचा घाट घातला जात असल्याच्या तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीच्या सचिवांना पत्र पाठवून प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
नाशिक : नाशिक बाजार समितीच्या ई-नाम कामकाजासाठी कंत्राटी पद्धतीने सहा महिन्यांसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना मागच्या दाराने कायम करण्याचा घाट घातला जात असल्याच्या तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीच्या सचिवांना पत्र पाठवून प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या कर्मचाºयांना मुदत संपूनही मार्केटच्या सेवेत कायम ठेवल्याने आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार मार्केटच्या संचालकांनीच केली आहे.
गेल्या वर्षी शासनाने बाजार समित्यांचे कामकाज ई-नाम पद्धतीने करण्याचा निर्णय जाहीर केल्याने त्यासाठी बाजार समितीत दररोज होणारी उलाढाल, शेतमालाचे भाव, लिलावाची माहिती आॅनलाइन पद्धतीने भरण्यासाठी नाशिक बाजार समितीने दहा कंत्राटी कर्मचाºयांची सहा महिन्यांसाठी नेमणूक केली होती. मानधनावर नेमलेल्या या कर्मचाºयांची मुदत संपुष्टात आल्यावर त्यांना परत पाठविणे क्रमप्राप्त असताना बाजार समितीचे अध्यक्ष व काही संचालकांनी या कर्मचाºयांना बाजार समितीच्या सेवेत कायम करण्यासाठी मागच्या दाराने प्रयत्न सुरू केले असल्याची तक्रार बाजार समितीचे विश्वास चिंतामण नागरे यांच्यासह सात संचालकांनी थेट जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. मुळात बाजार समितीचे ई-नाम कामकाज पूर्ण क्षमतेने होत नसून, त्यात कर्मचाºयांना कायम करण्याच्या निर्णयाची माहिती संबंधितांनी अन्य संचालकांना दिली नसल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
१८ जानेवारी २०१८ च्या आदेशान्वये सहा महिन्यांसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाºयांची मुदत संपुष्टात आल्यानंतरही त्यांच्यावर केल्या जाणाºया खर्चामुळे बाजार समितीचे आर्थिक नुकसान झाले असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आल्याने जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी बाजार समितीच्या सचिवाला पत्र पाठवून संचालकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
कायम करण्यासाठी मागच्या दाराने प्रयत्न सुरू
बाजार समितीत दररोज होणारी उलाढाल, शेतमालाचे भाव, लिलावाची माहिती आॅनलाइन पद्धतीने भरण्यासाठी नाशिक बाजार समितीने दहा कंत्राटी कर्मचाºयांची सहा महिन्यांसाठी नेमणूक केली होती. मानधनावर नेमलेल्या या कर्मचाºयांची मुदत संपुष्टात आल्यावर त्यांना परत पाठविणे क्रमप्राप्त असताना बाजार समितीचे अध्यक्ष व काही संचालकांनी या कर्मचाºयांना बाजार समितीच्या सेवेत कायम करण्यासाठी मागच्या दाराने प्रयत्न सुरू केले असल्याची तक्रार बाजार समितीचे विश्वास चिंतामण नागरे यांच्यासह सात संचालकांनी थेट जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती.