मुक्त विद्यापीठातील कर्मचारी टाकणार बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:09 AM2018-03-13T01:09:39+5:302018-03-13T01:09:39+5:30
आरोग्य विद्यापीठातील कर्मचारी आंदोलनापाठोपाठ आता यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्तविद्यापीठाच्या अधिकारी कर्मचाºयांच्या संघटनेने समस्यांबाबत उचल घेतली आहे. कर्मचाºयांची वैद्यकीय सुविधा, बदल्या तसेच चौकशीधीन असलेल्या अधिकाºयांकडील कार्यभार यावर टीका करतानाच संघटनेने विद्यापीठाने या मागण्यांची दखल न घेतल्यास पुढील आठवड्यापासून बहिष्कार टाकण्याचा निर्णय सोमवारी (दि.१२) झालेल्या महाराष्टÑ मुक्तविद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.
नाशिक : आरोग्य विद्यापीठातील कर्मचारी आंदोलनापाठोपाठ आता यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्तविद्यापीठाच्या अधिकारी कर्मचाºयांच्या संघटनेने समस्यांबाबत उचल घेतली आहे. कर्मचाºयांची वैद्यकीय सुविधा, बदल्या तसेच चौकशीधीन असलेल्या अधिकाºयांकडील कार्यभार यावर टीका करतानाच संघटनेने विद्यापीठाने या मागण्यांची दखल न घेतल्यास पुढील आठवड्यापासून बहिष्कार टाकण्याचा निर्णय सोमवारी (दि.१२) झालेल्या महाराष्टÑ मुक्तविद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. विद्यापीठ अधिकारी आणि कर्मचाºयांच्या प्रश्नांबाबत विद्यापीठाच्या पोर्चमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी विविध निर्णय घेण्यात आले. विद्या-पीठातील ज्या प्राध्यापक, संचालक आणि कर्मचाºयांची चौकशी सुरू आहेत, त्यांच्याकडील कार्यभार तातडीने काढून घ्यावेत आणि चौकशी समितीचे अहवाल जाहीर करून त्यानुसार संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यापीठातील सर्व कर्मचाºयांच्या वेतनातून २०१० पासून कर्मचारी कल्याण निधी अंतर्गत ६० व ३० रुपये विनासंमती बेकायदेशीररीत्या कापले जात असून, ही कपात थांबवावी आणि विनासंमती कपात केलेली रक्कम व्याजासह परत करावी करावी, कर्मचाºयांच्या हितासाठी विद्यापीठ फंडा-तूनच खर्चाची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली. विद्यापीठाने कॅशलेससाठी शहरातील एका रुग्णालयाची निवड करण्यात आली असून, ती अत्यंत चुकीची आहे. विद्यापीठाचे राज्यस्तरीय कार्यक्षेत्र असताना शहरातील एकाच रुग्णालयाशी करार करणे गैर असून, तो तातडीने रद्द करावा, देशातील प्रमुख शहरात चालेल अशा रुग्णालयांची निवड करावी त्याचप्रमाणे विद्यापीठाचे बदली धोरण अत्यंत सोयीचे असून, आकसापोटी बदल्या करण्यात येतात तर काहींवर मेहरनजर दाखवून त्याच त्या विभागात बदली केली जाते, त्यामुळे निश्चित धोरण ठरवावे, कोणत्याही विनाजाहिरात करण्यात येत असलेली भरती रद्द करावी, शासनाला तातडीने कर्मचारी आकृतिबंध सादर करून पदोन्नतीसह अन्य प्रक्रिया राबवाव्या, अशा मागण्यांचे निवेदन कुलसचिव दिनेश भोंडे यांना देण्यात आले.
आडमुठी भूमिका : जागा देण्यास नकार
विद्यापीठाचा एक कर्मचाºयाची मुंबईत बदली करण्यात आली होती. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या या कर्मचाºयाला नाशिकमध्ये बदली हवी असल्याने अर्ज केला होता, परंतु कर्करोग होऊनही त्याच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात आला नाही, अखेरीस त्याचा मृत्यू झाला. त्याविषयी बैठकीत तीव्र भावना करण्यात आला. विद्यापीठाच्या कर्मचाºयांना बैठकीसाठी जागा उपलब्ध न देण्यात आल्याने ही बैठक पोर्चमध्ये घेण्यात आली आणि प्रशासनाच्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.