डेली वसुलीवरच कर्मचाऱ्यांचे वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 08:38 PM2020-06-10T20:38:06+5:302020-06-11T01:00:37+5:30

पेठ : कोरोना विषाणूचा संसर्ग आणि त्यामुळे घोषित झालेला लॉकडाऊन यामुळे सर्वच क्षेत्रावर कमी जास्त प्रमाणात प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अवघ्या चार-पाच वर्षाच्या स्थापनेनंतर नुकतेच विकासाचे बाळसं धरू पाहणाºया पेठ नगरपंचायतीलाही या कोरोनाचा मोठा आर्थिक फटका बसला असून, अपूर्ण निधी व मुदतीत कामे पूर्ण न झाल्याने विकासकामांना ब्रेक लागला आहे.

Employees' salaries only on daily recovery | डेली वसुलीवरच कर्मचाऱ्यांचे वेतन

डेली वसुलीवरच कर्मचाऱ्यांचे वेतन

Next

पेठ : (रामदास शिंदे ) कोरोना विषाणूचा संसर्ग आणि त्यामुळे घोषित झालेला लॉकडाऊन यामुळे सर्वच क्षेत्रावर कमी जास्त प्रमाणात प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अवघ्या चार-पाच वर्षाच्या स्थापनेनंतर नुकतेच विकासाचे बाळसं धरू पाहणाºया पेठ नगरपंचायतीलाही या कोरोनाचा मोठा आर्थिक फटका बसला असून, अपूर्ण निधी व मुदतीत कामे पूर्ण न झाल्याने विकासकामांना ब्रेक लागला आहे. दैनंदिन भरणाºया भाजी बाजाराच्या तुटपुंज्या वसुलीवर नगरपंचायतीचा आर्थिक गाडा कसाबसा हाकण्याची लोकप्रतिनिधी व प्रशासनावर वेळ आली आहे.
पेठ ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा मिळाल्यानंतर प्रथमच स्थापन झालेल्या मंडळाला पहिले २-३ वर्ष शासकीय प्रक्रि या व विकास आराखडे तयार करण्यातच घालवावी लागली.
नंतरच्या काळात परप्रांतीय मजुरांनी गावाकडची वाट धरल्याने सुरू असलेल्या कामांना ब्रेक लागला. नगरपंचायतीला बाजार गाळे भाडेपट्टीतून बºयापैकी उत्पन्न मिळत असते. मात्र तीन महिन्यांपासून लहान-मोठे सर्वच व्यवहार बंद असल्याने व शासनाने वसुलीवर निर्बंध ठेवल्याने वसुलीचा आकडा उद्दिष्टापर्यंत पोहचू शकला नाही. शासकीय अनुदानाच्या भरवशावर रस्ते, गटारी, सांडपाणी, पाणीपुरवठा, घनकचरा विलगीकरण अशी अनेक कामे रखडली आहेत.
--------------------
१) मागील वर्षापासून नगरपंचायतीची विकासकामे गती घेतील अशी आशा असताना ऐन मार्च महिन्यात जाहीर
झालेल्या लॉकडाऊनमुळे नगरपंचायतीच्या विकासकामांना खीळ बसली.
२) मार्च महिना तसा आर्थिक वर्षाचा अंतिम महिना असल्याने सर्वच विभागांची १०० टक्के वसुली करण्याबरोबर शासनाकडील निधी प्राप्त करून विहीत वेळेत कामे पूर्ण केली जातात.
३) ना वसुली करता आली ना शासकीय निधी खर्च करता आला. अशा आर्थिक कोंडीत नगरपंचायतीचा कारभार सापडला आहे. लॉकडाऊनमध्ये व्यवहार ठप्प झाल्याने उत्पन्नात कमालीची घट झाल्याचे दिसून आले.
----------------------
१३ कोटींची पाणीपुरवठा योजना ठप्प
४पेठ शहराची वाढती लोकसंख्या व शहरीकरणामुळे १३ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर असूनही लॉकडाऊनमुळे ३१ मेपर्यंत काम पूर्ण करणे शक्य नसल्याने प्राप्त निधी परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक विकासकामांच्या निविदा व कार्यारंभ आदेश निर्गमित होऊनही विहीत वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने विकासकामांची गती मंदावली आहे. सन २०१८-१९ या वर्षी नगरपंचायतीला ४ कोटी ८० लाख शासकीय निधी प्राप्त झाला होता. सन २०१९-२० मध्ये केवळ १ कोटी ७३ लाख निधी प्राप्त झाल्याने नगरपंचायतीचे आर्थिक गणित बिघडले.
---------------------
असे आहेत वसुलीचे आकडे
तपशील - सन २०१८-१९ सन २०१९-२०
४घरपट्टी - ३,६७,३०७ ९,९६,०००
४पाणीपट्टी - ३,४१,३४० २,३७,३८०
४ गाळा भाडे - ३,५८,९९० ३,२१,५००
४ विकास शुल्क - २,३०,९०८ १,१०,७७८
----------------------
पेठ नगरपंचायत ही आदिवासीबहुल क्षेत्रात असल्याने व्यावसायिक व औद्योगिक दृष्ट्या उत्पन्नाचे मोठी
साधने नाही. त्यामुळे अत्यंत तुटपुंज्या निधीवर नगरविकास करावा लागत असून, शासनाने आदिवासी क्षेत्रातील नगरपंचायतींना स्वतंत्र आर्थिक पॅकेज देण्यासाठी विचार करावा. यावर्षी आर्थिक फटका बसल्याने नगरपंचायतच्या पुढील वर्षाच्या नियोजन आराखड्यावर भार येणार असल्याने कोरोनामुळे नगरपंचायत प्रशासन आर्थिक विवंचनेत सापडले असले तरी आगामी काळात जनतेला नागरी सुविधा देण्यासाठी नगरपंचायत कटिबद्ध आहे.
- मनोज घोंगे, नगराध्यक्ष, पेठ

Web Title: Employees' salaries only on daily recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक