कर्मचाºयास मारहाणीच्या निषेधार्थ धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 09:56 PM2019-07-09T21:56:08+5:302019-07-09T21:56:30+5:30
मालेगाव : येथील सामान्य रुग्णालयातील कर्मचारी गणेश पाटील यांना झालेल्या मारहाणीच्या व महिला परिचारिकेशी हुज्जत घातल्याच्या निषेधार्थ व रुग्णालयात स्वतंत्र पोलीस चौकी स्थापन करून वाढीव पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांनी मंगळवारी (दि. ९) सकाळी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन छेडले होते.
मालेगाव येथील सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी.
मालेगाव : येथील सामान्य रुग्णालयातील कर्मचारी गणेश पाटील यांना झालेल्या मारहाणीच्या व महिला परिचारिकेशी हुज्जत घातल्याच्या निषेधार्थ व रुग्णालयात स्वतंत्र पोलीस चौकी स्थापन करून वाढीव पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांनी मंगळवारी (दि. ९) सकाळी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन छेडले होते.
वैद्यकीय अधीक्षक किशोर डांगे व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना मागण्यांचे निवेदन सादर करून संशयितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास महिला कक्षात साफसफाई सुरू असल्यामुळे दरवाजा बंद होता. सदर दरवाजा लवकर का उघडला नाही अशी कुरापत काढून रुग्णांच्या नातेवाइकांनी वॉर्डबॉय गणेश शिंदे यास मारहाण केली तसेच परिचारिका अपेक्षा वडनेरे यांच्याशीही हुज्जत घातली. या घटनेच्या निषेधार्थ कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन
केले.
या आंदोलनात सामान्य रुग्णालयाचे डॉ. योगेश पाटील, डॉ. विजय गवळी, अलका भावसार, उज्ज्वला सावंत, तुषार सूर्यवंशी, प्रशांत सूर्यवंशी, दत्ता जाधव, संदीप राठोड, वसंत हिरे, सतीश पगार, विजय जगताप, प्रकाश जाधव, महेश शिंदे आदींसह परिचारिका, कर्मचारी सहभागी झाले होते.या प्रकाराच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन करून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले. संबंधितांवर कारवाई करावी व रुग्णालय आवारात पोलीस चौकी देऊन पोलीस कर्मचाºयांची संख्या वाढवून पूर्णवेळ कर्मचाºयांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.