कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले
By admin | Published: April 18, 2015 12:35 AM2015-04-18T00:35:19+5:302015-04-18T00:35:46+5:30
कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले
पुरवठा खात्यात काम करण्यास कर्मचारी नाखूष पुरवठा निरीक्षकांची बदल्यांची मागणी : अतिरिक्त भार स्वीकारण्यास नकार नाशिक : सुरगाणा व सिन्नर येथील धान्य घोटाळा प्रकरणी थेट जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदारांना कारवाईला सामोरे जावे लागल्यामुळे जिल्'ात पुरवठा विभागाशी संबंधित कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून, त्यातील अनेकांनी थेट पुरवठा विभागातून बदली करण्याची मागणी केली असून, खुद्द कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही अतिरिक्त भार स्वीकारण्यास नकार दिला आहे. जानेवारी महिन्यापासूनच पुरवठा खात्याचा कारभार अधिक चर्चिला जात असल्याने व त्यातूनच जिल्हा पुरवठा कार्यालयातील तिघा कर्मचाऱ्यांना निलंबनास सामोरे जावे लागले आहे. यासंदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे जिल्हा पुरवठा कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड दहशत व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील कातडी बचाव भूमिका घेतल्यामुळे अगोदरच घाबरलेले कर्मचारी हवालदिल झाले असून, कधी बदल्या होतील, अशी प्रतीक्षा लागून आहे. गेल्या आठवड्यातच जिल्'ात पुरवठा निरीक्षक व तालुका पातळीवर पुरवठा अव्वल कारकून म्हणून काम करणाऱ्या सुमारे ३० कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत, कामाचा अतिरिक्त ताण सहन होत नसल्याने आपल्याकडील पुरवठा विभागाचे काम काढून घ्यावे किंवा अन्य विभागात बदली करावी, अशी विनंती केली आहे