अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यास सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 06:29 PM2018-08-28T18:29:07+5:302018-08-28T18:35:27+5:30

नाशिक : खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलावून दोन चिमुकल्या बहिणींवर लैंगिक अत्याचार करणारा प्रेमलाल छोटेलाल राजपूत (५५, रा. सोमवार बाजार, थोरात गल्ली, देवळाली कॅम्प) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ टी़ पांडे यांनी मंगळवारी (दि़२८) चार वर्षे सक्तमजुरी व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ६ जानेवारी २०१७ रोजी ही घटना घडली होती.

Employees who oppress minor girls | अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यास सक्तमजुरी

अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यास सक्तमजुरी

googlenewsNext
ठळक मुद्देदोन चिमुकल्या बहिणींवर लैंगिक अत्याचार ; पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा

नाशिक : खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलावून दोन चिमुकल्या बहिणींवर लैंगिक अत्याचार करणारा प्रेमलाल छोटेलाल राजपूत (५५, रा. सोमवार बाजार, थोरात गल्ली, देवळाली कॅम्प) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ टी़ पांडे यांनी मंगळवारी (दि़२८) चार वर्षे सक्तमजुरी व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ६ जानेवारी २०१७ रोजी ही घटना घडली होती.

आरोपी प्रेमकुमार राजपूत हा गल्लीतील चार व सात वर्षांच्या दोन बहिणींना खेळविण्याच्या बहाण्याने स्वत:च्या घरामध्ये बोलावून घ्यायचा व त्याच्यासोबत लैंगिक चाळे करून अत्याचार करायचा़ ही बाब या मुलींच्या आईच्या लक्षात येताच त्यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर त्याच्या विरोधात लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता़

न्यायाधीश पांडे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील योगेश कापसे यांनी पीडित मुली, त्यांची आई व अन्य पाच असे आठ साक्षीदार तपासून सबळ पुरावे सादर केले़ यामध्ये राजपूत हा दोषी आढळून आल्याने त्यास चार वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंड तसेच दंडाची रक्कम पीडित मुलींच्या आईला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत़

या गुन्ह्याचा तपास उपनगर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक संध्या तेली यांनी केला़ न्यायालयातील पैरवी अधिकारी हवालदार के. के. गायकवाड, एम. के. माळोदे यांनी पाठपुरावा केला.

Web Title: Employees who oppress minor girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.