अधिकाऱ्यांच्या संगणकावर कर्मचारीच करतात काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:32 AM2019-04-21T00:32:28+5:302019-04-21T00:32:48+5:30

विभागीय अधिकाऱ्यांच्या संगणकावर पासवर्ड टाकून अन्य कर्मचारी करतात काम आणि संबंधित अधिकाºयांना संगणकाचे ज्ञान तर नाहीच, परंतु माउसही धरता येत नाही,

 Employees work on official computers | अधिकाऱ्यांच्या संगणकावर कर्मचारीच करतात काम

अधिकाऱ्यांच्या संगणकावर कर्मचारीच करतात काम

Next

इंदिरानगर : विभागीय अधिकाऱ्यांच्या संगणकावर पासवर्ड टाकून अन्य कर्मचारी करतात काम आणि संबंधित अधिकाºयांना संगणकाचे ज्ञान तर नाहीच, परंतु माउसही धरता येत नाही, असा प्रकार आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या पूर्व विभागीय कार्यालयाच्या भेटीत शनिवारी (दि.२०) आढळला. त्यामुळे आयुक्तांनी पूर्व विभागाच्या विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांना धारेवर धरले.
शनिवारी (दि. २०) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास महापालिका आयुक्त गमे यांनी अचानक भेट दिली. यावेळी विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या कक्षातील संगणकावर कर्मचारी काम करीत होता त्यामुळे सोनवणे यांनी संगणकावर तुम्ही पासवर्ड देऊन अन्य कर्मचाºयांकडून काम करून घेतात काय अशी विचारणा केलीच, परंतु संगणक आॅपरेट करून दाखवा, असे सांगून थेट परीक्षाच घेतली; परंतु सोनवणे यांना ते करता आले नाही. आयुक्तांनी त्यावर मॅडम साधा तुम्हाला माउससुद्धा धरता येत नाही तर तुम्ही काम काय करणार, अशी विचारणा करीत आयुक्तांनी खरडपट्टी काढली.
दरम्यान, घरपट्टी व पाणीपट्टी विभागातील आयुक्तांनी भेट दिली तेव्हा तेथील कर्मचारी बसून होते तुम्ही काय करता असा प्रश्न करीत पाणीपट्टी वसूल करा आणि थकबाकीदारांचे नळ पुरवठा बंद करा असे आदेश देतानाच कार्यालयातील अतिरिक्त कर्मचाºयांनाही घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी बाहेर पाठवा, असे विभागीय अधिकाºयांना सांगितले. तसेच प्रत्येक विभागात आवक-जावकसाठी कर्मचारी असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्व विभाग मिळून एकच कर्मचारी ठेवा, असेही महापालिका आयुक्त गमे यांनी बजावले.
अधिकाºयांना खडसावले
विवाह नोंदणी विभागात कर्मचाºयाच्या ऐवजी शिपाई काम करत असताना दिसून आल्याने कर्मचारी कुठे गेले, शिपायांचे शिपायांना काम करू द्या असे खडसावले. तसेच यानंतर विभागीय कार्यालयालगत असलेल्या जिजामाता रु ग्णालयात भेट दिली. सर्व विभागाची पाहणी केली. त्यांच्या समवेत सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यालयातील अतिरिक्त कर्मचाºयांनाही घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी बाहेर पाठवा, असे विभागीय अधिकाºयांना सांगितले. तसेच प्रत्येक विभागात आवक-जावकसाठी कर्मचारी असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली.
कर्मचारी  व्हॉट्स अ‍ॅपमध्ये  व्यस्त
विद्युत विभागात आयुक्तांनी दिलेल्या भेटीच्या वेळी तेथील कर्मचारी मोबाइलवर व्हॉट्स अ‍ॅप बघत टाइमपास करत असताना दिसून आल्याने कर्मचारी मोबाइल खेळण्यात व्यस्त असतात का? असा प्रश्न विचारला. तसेच रेकॉर्ड रूमला पाच ते सहा कर्मचारी होते त्यांना विचारणा केली असता तुम्ही काय करता तर त्यांनी असे उत्तर दिले आम्ही जुने रेकॉर्ड बघत आहे, त्यावर आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सर्व कर्मचारी रेकॉर्ड बघताय का अशी विचारणा केली सदर इमारत पुरातन असून तिचे जतन करा, खिडक्यांच्या काचा फुटलेल्या, भिंतीवर गवत व पिंपळाचे झाड आलेले पाहून त्यांनी देखभालीकडे लक्ष देण्याचे आदेश दिले.

Web Title:  Employees work on official computers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.