एसटीतील सफाई कर्मचाऱ्यांची पदे गोठवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:23 AM2017-12-29T00:23:18+5:302017-12-29T00:28:06+5:30

राज्य परिवहन महामंडळ तोट्यात असल्याचे जाहीर करणाºया महामंडळाने अलीकडे कंत्राटी पद्धत आणि गाड्या खरेदी तसेच स्टॅन्ड दुरुस्तीवर करोडो रुपये खर्च करण्याचे नियोजन केले असून, एसटीच्या काही विभागांचे खासगीकरण करण्यासाठी महामंडळातीलच कर्मचाऱ्यांची पदे गोठविण्यात आली आहेत.

employees,staff,frozen,st,bus | एसटीतील सफाई कर्मचाऱ्यांची पदे गोठवली

एसटीतील सफाई कर्मचाऱ्यांची पदे गोठवली

Next
ठळक मुद्दे१५० कर्मचाऱ्यांना आता इतर विभागांत ढकलले जाणार २० महिन्यांपासून वेतन कराराचा प्रश्न प्रलंबित

खासगीकरणाचा फटका : एसटी महामंडळाचा निर्णय
नाशिक : राज्य परिवहन महामंडळ तोट्यात असल्याचे जाहीर करणाºया महामंडळाने अलीकडे कंत्राटी पद्धत आणि गाड्या खरेदी तसेच स्टॅन्ड दुरुस्तीवर करोडो रुपये खर्च करण्याचे नियोजन केले असून, एसटीच्या काही विभागांचे खासगीकरण करण्यासाठी महामंडळातीलच कर्मचाऱ्यांची पदे गोठविण्यात आली आहेत. महामंडळाच्या स्वच्छता विभागाचे खासगीकरण करताना या विभागात काम करणाऱ्यांची पदे गोठविण्यात आल्याने नाशिक विभागात काम करणाऱ्या सुमारे १५० कर्मचाऱ्यांना आता इतर विभागांत ढकलले जाणार आहे.
राज्य परिवहन महामंडळात सध्या वेतन करार तसेच एसटीला होणारा तोटा या भोवतीच संपूर्ण राजकारण फिरत आहे. त्यामुळे २० महिन्यांपासून वेतन कराराचा प्रश्न प्रलंबित आहे. दुसरीकडे एसटी तोटादेखील जाहीर केला आहे, असे असताना महामंडळात मात्र खासगीकरण आणि नूतनीकरणाबरोबरच खरेदी, पदभरतीच्या संदर्भात अनेक निर्णय घेतले जात आहेत. यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्येच संभ्रमावस्था असून, खासगीकरण आणि कंत्राटीकरण पुढे येत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे.
राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील सर्व डेपोंमधील बसची स्वच्छता तसेच सफाई कामांचे कंत्राटीकरण केलेले आहे. सुमारे ४५० कोटींचा हा कारार करण्यात आल्याची चर्चा असून, नाशिक जिल्ह्यासाठी सुमारे १२५ कोटींचे कंत्राट देण्यात आल्याचे समजते. कंत्राटदाराला स्वच्छता कामासाठी त्याच्याकडील कर्मचारी नियुक्तीची परवानगी असल्याने खासगीकरणातून त्यांनी काही कर्मचारी कामावरही आणले आहेत. परंतु मूळ एसटीतील स्वच्छता आणि सफाई कर्मचारी म्हणून रुजू झालेली आणि रुजू होणाºया अनुकंपातत्त्वावरील कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण ही पदे आता एसटीच्या आस्थापनेवरून गोठविण्यात आली असल्याने अनुकंपावरील कर्मचाºयांच्या नियुक्तीचादेखील प्रश्न निर्माण झाला आहे.
एसटीमध्ये ५ टक्के अनुकंपावरील कर्मचाºयांची नियुक्ती केली जाते. ही बहुतांश नेमणूक स्वच्छता आणि स्वच्छक कर्मचाºयांच्या रूपात होत असते. कारण अनुकंपाधारक म्हणून बहुतांश महिला आणि अल्पशिक्षित असतात. काहींचे वयदेखील अधिक असते. अशा कर्मचाºयांना एसटीतील इतर विभागांत काम देता येणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य दिले जाते. परंतु आता स्वच्छता कामाचे खासगीकरण झाल्याने आणि सफाई कर्मचारी, स्वच्छकाची पदे गोठविण्यात आल्यामुळे यापुढे या पदांवर कोणतयही प्रकारची भरती होऊ शकणार नाही.
--इन्फो--
अनुकंपाधारकांचे काय
नाशिक विभागात जवळपास १४०च्या जवळपास स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहे. या कर्मचाºयांना इतर विभागांत वर्ग करण्याचे काम हळूहळू सुरू आहे, तर अनुकंपाधारकांना तसेच स्वच्छतेची कामे करणाºया कर्मचाºयांच्या हक्काच्या कामावर आता गदा आली आहे. ही कामे ठेकेदार करू लागल्याने एसटीच्या सेवेतून स्वच्छता कर्मचाºयांचा प्रश्न संपुष्टात आला आहे. त्यामुळे या वर्गाला कोठे सामावून घ्यावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
--अजब तोडगा--
सफाई कर्मचाºयांची पदे गोठविण्यात आल्यानंतर या पदावरील विद्यमान कर्मचारी तसेच अनुकंपावरील कर्मचाºयांनी किमान दहावी उत्तीर्ण केली तर त्यांना कनिष्ठ सहायक म्हणून सामावून घेण्याचा अजब तोहगा महामंडळाने घेतला आहे. वास्तविक अनेक लोक चौथी पास नापास आहेत. काहींचे शिक्षण त्यापेक्षाही कमी आहे. अशा कर्मचाऱ्यांना विशेषत: महिला कर्मचाऱ्यांना या वयात परीक्षा देण्यास सांगणे वास्तव्यात शक्य नसल्याने या कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
--कोट--
कर्मचाऱ्यांवर अन्याय
राज्य परिवहन महामंडळाने स्वच्छता कामाचे खासगीकरण केल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या रोेजगाराचा प्रश्न आहे. कर्मचाऱ्यांसाठी महामंडळानेच त्यांना ९० दिवसांचे ट्रेनिंग देऊन त्यांना कनिष्ठ सहायक म्हणून नोकरीची हमी दिली पाहिजे. स्वच्छतेची काही कामे पारंपरिक पद्धतीने चालत आलेली आहेत. त्या कामावरही हक्काने काम मिळणार नसेल तर नाराजी नक्कीच पसरेल. ही पदे न गोठविल्याने कर्मचाऱ्यांना इतरत्र सामावून घेतले पाहिजे.
- नवाझ सय्यद, श्रमिक सेना
जिल्हा सरचिटणीस

Web Title: employees,staff,frozen,st,bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.