सिन्नरला रोजगार व उद्योजकता मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 05:50 PM2019-01-16T17:50:34+5:302019-01-16T17:50:49+5:30

सिन्नर : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक, दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, सिन्नर नगर परिषद व सिन्नर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार व उद्योजकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Employment and Entrepreneurship Meet in Sinnar | सिन्नरला रोजगार व उद्योजकता मेळावा

सिन्नरला रोजगार व उद्योजकता मेळावा

Next

सिन्नर : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक, दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, सिन्नर नगर परिषद व सिन्नर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार व उद्योजकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरूवार (दि. १७) रोजी सकाळी १० वाजता सिन्नर महाविद्यालयात आमदार राजभाऊ वाजे यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळाव्याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी जिल्हा कौशल्य विकास अधिकारी एम. आर. तडवी, प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, उपप्राचार्य राजेंद्र पवार, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, अर्जुन भोळे आदी उपस्थित होते. कौशल्य विकास योजनेत गतवर्षी १२० सुशिक्षित बेरोजगार तर यावर्षी ४०० प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण सुरू असल्याची माहिती दुर्वास यांनी दिली. सिन्नरला माळेगाव, मुसळगावसह नाशिकच्या सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतींमध्ये संपर्क साधून ४०० संधी शोधल्या असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Employment and Entrepreneurship Meet in Sinnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार