सुरगाणा तालुक्यात रोजगार हमीची कामे सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 11:33 PM2020-04-25T23:33:24+5:302020-04-25T23:34:17+5:30

सध्या कोरोना विषाणूने अवघ्या जगभर विळखा घातला आहे. त्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू झाले आहे.

Employment guarantee work will start in Surgana taluka | सुरगाणा तालुक्यात रोजगार हमीची कामे सुरू होणार

सुरगाणा तालुक्यात रोजगार हमीची कामे सुरू होणार

Next

अलंगुण : सध्या कोरोना विषाणूने अवघ्या जगभर विळखा घातला आहे. त्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू झाले आहे.
यामुळे सुरगाणा तालुक्यातील बरेच गोरगरीब आपले गाव सोडून मजुरीसाठी लासलगाव, पिंपळगाव, निफाड, खेडगाव, वणी, दिंडोरी, नाशिक आदी भागात गेले होते. या देशीभागात हाताला मिळेल ते काम करून बायका-मुलांसह कसाबसा उदरनिर्वाह करत होते. मात्र, आता सुरगाणा पंचायत समितीचे उपसभापती इंद्रजीत गावित यांच्या प्रयत्नातून तालुक्यासाठी शासनाकडून रोजगार हमी योजनेचा निधी प्राप्त झाला असून लवकरच कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती गावित यांनी दिली आहे.
शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जास्तीत जास्त गोरगरिबांना रोजगार देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. सुरगाणा पंचायत समितीने तीन टप्प्यांतील रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यात पहिल्या टप्यात ५००० गरिबांच्या हाताला काम देणे. दुसऱ्या टप्प्यात १०००० व तिसºया टप्प्यात २०००० लोकांना काम देण्याचा प्रयत्न करणार, अशी ग्वाही गावित यांनी दिली.
यासाठी गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्या प्रमुख नियोजनात वरिष्ठ खातेप्रमुख तसेच ग्रामसेवक व रोजगारसेवक आदींची बैठक घेऊन तसे नियोजन केल्याचे गावित यांनी सांगितले. जलसंधारण, जलसिंचन, पशुंसाठी गोठ्याचे बांधकाम, फलोत्पादन, शेतीला जोडणारे रस्ते, नाला सरळीकरण करणे, सामूहिक विहिरीचे काम, वृक्षारोपणाची पूर्वतयारी, व्हर्मी कंपोस्ट अशा अनेक कामांसाठीची केंद्र व राज्य शासनाची नाशिक जिल्ह्यासाठी प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळाली आहे.
दरम्यान कोरोनामुळे अनेकांचा
रोजगार गेला असून आता सुरू होणाºया कामांमुळे उपासमार थांबणार असल्याची भावना रोजंदारी कामगारांमध्ये निर्माण झाली आहे़

Web Title: Employment guarantee work will start in Surgana taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार