कौशल्य विकास विभागाच्या नावात ‘रोजगार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:58 PM2020-10-06T23:58:15+5:302020-10-07T01:10:03+5:30
नाशिक: तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी असलेल्या ‘कौशल्य विकास व उद्योजकता’ या विभागाचे आता नामकरण करण्यात आले असून त्यामध्ये ‘रोजगार’ शब्द जोडण्यात आला आहे. याबाबतचे आदेश नुकतेच राज्य शासनाने काढले आहेत.
नाशिक: तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी असलेल्या ‘कौशल्य विकास व उद्योजकता’ या विभागाचे आता नामकरण करण्यात आले असून त्यामध्ये ‘रोजगार’ शब्द जोडण्यात आला आहे. याबाबतचे आदेश नुकतेच राज्य शासनाने काढले आहेत.
राज्यात १९९७ मध्ये ‘रोजगार व स्वयंरोजगार’ विभाग तयार करण्यात आला होता. तरुणांना नोकरी तसेच स्वयंरोजगाराची संधी देणाऱ्या या विभागात तरुणांची नावे नोंदली जात होती. त्यावेळी शासकीय नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने नावे नोंदविण्याला प्राधान्हही दिले जात होते. या विभागाच या माध्यमातून अनेकांना नोकरीच्या संधी देखील मिळालेल्या आहेत.
२०१५ मध्ये शाासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने एका आदेशान्वये या विभागाचे नाव ‘कौशल्य विकास व उद्योजकता’ असे करण्यात आले. तरुणांनामध्ये असलेल कौशल्याचा विकास करून त्यांना उद्योगासाठी प्रोत्साहीत तसेच संधी देण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, या विभागाच्या अखत्यारीतील सर्व संस्था त्सेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा समावेश करण्यात आलेला आहे. ‘कौशल्य विकास व उद्योजकता’ या नावात रोजगार हा शब्दच नसल्याने रोजगार आणि स्वयंरोजगार याा बाबींशी संबंधित विभाग कोणता याबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने आता त्यामध्ये ‘रोजगार‘ शब्द समाविष्ट करण्यात आला आहे.
‘कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग’ असे या विभागाचे आता नामकरण करण्यात आले आहे. गेल्या जुलैमध्येच याबाबतच्या बदलाला मंत्रीमंडळाने मंजुरी दिली होती. त्याचे आदेश नुकतेच काढण्यात आले.
रोजगाराची शाश्वती नाहीच
‘कौशल्य विकास व उद्योजकता’ विभागात ‘रोजगार’ शब्द जोडण्यात आला असला तरी त्यातून नोकरीच्या संधी उपलब्ध होतीलच याविषयी शंका आहे. स्वयंरोजगारातून रोजगार अशीच या मागणी संकल्पना असल्यानेच नामकरण करण्याच आले असल्याची चर्चा आहे. नामकरण केवळ प्रशासकीय सोयीच्या संकल्पनेसाठी करण्यात आल्याचेही बोलले जात आहे.