जॉब फेअरच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचा पुढाकार : १५०० हून अधिक उमेदवारांनी दिल्या मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 11:57 PM2017-09-28T23:57:08+5:302017-09-29T00:07:52+5:30
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि इंजिनिअरिंग क्लस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बेरोजगार मेळाव्यास (जॉब फेअरचा) प्रतिसाद लाभला असून, १९ कंपन्यांमध्ये रोजगारासाठी एकूण १५०० बेरोजगार उमेदवारांनी सहभाग नोंदविला.
सिडको : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि इंजिनिअरिंग क्लस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बेरोजगार मेळाव्यास (जॉब फेअरचा) प्रतिसाद लाभला असून, १९ कंपन्यांमध्ये रोजगारासाठी एकूण १५०० बेरोजगार उमेदवारांनी सहभाग नोंदविला.
अंबड येथील नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये बेरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पदवीधर ट्रेनी, पदव्युत्तर ट्रेनी, आयटीआय फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, टर्नर, शीटमेटल, ट्रेनी डाटा एन्ट्री, मेकॅनिकल इंजिनिअर व मॅन्युफक्चरिंग कामाचा अनुभव असलेले सीएनसी आॅपरेटर, केमिस्ट, सॉफ्टवेअर इंजिनिअर, रिसेप्शनिस्ट, कॅलिबरेशन इंजिनिअर, टूल मेकर आदी पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखती जिल्हा कौशल्य विकास रोजगारचे सहायक संचालक एस. पी. चाटे, उपसंचालक सुनील सैंदाणे, प्रदीप गावित, नाशिक इंजिनिअरिंचे अध्यक्ष नरेंद्र गोलिया, अशोक बंग, नरेंद्र बिरार, कुलकर्णी, अमोल येवले आदींसह महिंद्रा सी.आय.इ. अॅटोमोटीव्हचे योगेश बºहाटे, ईपीसी इंडस्ट्रीजचे बाबासाहेब पवार, डाटा मॅटक्सचे कमलेश पिसे, डब्ल्यूएनएसचे लतेश देवडीकर याबरोबरच महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, डी. जी. डाटा सोल्युशन, आर्ट रबर, फिनोटेक्स फायबरकास्ट आदींसह १९ कंपन्यांचे अधिकारी सहभागी झाले होते. या मेळाव्यासाठी ५०० रिक्त पदांसाठी जिल्ह्णासह इतर ठिकाणाहून १५०० हून अधिक उमेदवारांनी मुलाखती दिल्या असल्याचे सांगण्यात आले.