‘आयमा’च्या माध्यमातून  युवकांना रोजगाराच्या संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:53 AM2019-04-01T00:53:35+5:302019-04-01T00:53:52+5:30

अंबड इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) व संदीप युनिव्हर्सिटी यांच्या माध्यमातून दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजने अंतर्गत बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली.

Employment opportunities for youth through 'Aima' youth | ‘आयमा’च्या माध्यमातून  युवकांना रोजगाराच्या संधी

‘आयमा’च्या माध्यमातून  युवकांना रोजगाराच्या संधी

Next

सिडको : अंबड इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) व संदीप युनिव्हर्सिटी यांच्या माध्यमातून दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजने अंतर्गत बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. या उपक्र मांतर्गत अंबड व सातपूर औद्योेगिक वसाहतीतील उद्योगांमध्ये सुमारे १५० तरु णांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असल्याचे आयमाच्या वतीने सांगण्यात आले.
अंबड औद्योगिक वसाहतीतील आयमा सभागृह येथे मुलाखत आयोजित केल्या होत्या. कार्यक्र मात व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष वरु ण तलवार, सरचिटणीस ललित बूब, राजेंद्र अहिरे, गोविंद झा, संदीप फाउंडेशनचे इंद्रजित सोनवणे, विशाल शिंदे, वैभव कांदळकर, निसार मन्सुरी, विशाल शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी आयमा अध्यक्ष वरु ण तलवार यांनी तरु णांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन गोविंद झा यांनी, तर आभार ललित बूब यांनी मानले. यावेळी आयमा माजी अध्यक्ष धनंजय बेळे, ज्ञानेश्वर गोपाळे, उपाध्यक्ष निखिल पांचाल, राजेंद्र पानसरे, योगीता आहेर, जगदीश पाटील, भास्कर मोरे, ज्ञानेश्वर पिंगळे, विकास माथुर, महेश कुलकर्णी, प्रज्ञा पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Employment opportunities for youth through 'Aima' youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.