बुलेट गाडीच्या माध्यमातून रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:11 AM2018-04-11T00:11:53+5:302018-04-11T00:11:53+5:30
मानोरी : सध्या दोन चाकी वाहनांमध्ये बुलेट गाडी जास्त प्रमाणात वापरली जात आहे.
मानोरी : सध्या दोन चाकी वाहनांमध्ये बुलेट गाडी जास्त प्रमाणात वापरली जात आहे. मानोरी बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी मच्छिंद्र शेळके यांची मनात इच्छा होती की बुलेट गाडी घ्यायची. आणि ही इच्छा शेळके यांनी सत्यात उतरून दहा वर्षांपूर्वी बुलेट गाडी खरेदी केली. परंतु बुलेटचा वापर शेळकेंनी इतर कामांना फाटा देत शेतीच्या कीटकनाशके फवारणीसाठी केला. मानोरी बुद्रुक, देशमाने, मुखेड खडकीमाळ आदी भागात याच बुलेटने गहू दळून घेतले जातात. एका दिवसात या मशीनद्वारे तब्बल सहा ते सात पोते ओले गहू दळून देण्याचा विक्रम शेळके यांनी केला आहे. या ओले गहू दळण्यापासून शेळकेंना रोजगाराची चांगल्या प्रमाणात उपलब्धी झाली आहे. एक दिवसात जवळपास अडीच हजार रुपयांपर्यंत रोज कमावून खर्च वजा जाता दोन हजार रुपये दिवसाला शिल्लक राहत आहेत. त्यामुळे मच्छिंद्र शेळके यांनी बुलेटचा उपयोग दोन कामांमधून ओले गहू दळणे व कीटकनाशक औषध फवारण्यासाठी यशस्वी करून दाखवला आहे. खरीप आणि रब्बी हंगामात ढगाळ वातावरणामुळे अनेक प्रकारचे रोग पिकांवर पडत असतात. त्यामुळे औषध फवारणी करण्यासाठी शेळके यांनी आपल्या बुलेट गाडीला पिष्टन नावाचे यंत्र बसवून ज्या शेतात औषध मारायचे थेट शेतात बुलेट घेऊन जात असतात. बुलेटचा दुसरा उपयोग पण शेळके यांनी यशस्वी करून दाखवला आहे. उन्हाळा सुरू झाला की साहजिकच महिलांची आवडती कामे म्हणजे डाळ तयार करणे, पापड करणे, कुरडया करणे आदी कामे महिला करत असतात. यातील एक काम म्हणजे कुरडया. ओले गहू दळण्यासाठी शेळके यांनी आपल्या बुलेट गाडीला ओले गहू दळण्याचे यंत्र बसवले आहे.