जलयुक्त शिवार योजनेमुळे युवकांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 10:10 PM2020-03-16T22:10:24+5:302020-03-16T22:12:48+5:30

नायगाव : शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमुळे नायगाव खोºयातील युवकांना गावातच मासेमारीचा रोजगार उपलब्ध झाला आहे. मार्चपर्यंत बंधारे पाण्याने भरलेले असल्यामुळे शेतीबरोबरच मच्छीमारीचा व्यवसाय तेजीत असल्यामुळे नायगावकरांसाठी आर्थिक शुभवर्तमान मानले जात आहे.

Employment of youth due to waterlogged Shivar Yojana | जलयुक्त शिवार योजनेमुळे युवकांना रोजगार

जायगाव येथील कपोता नदीत मासेमारी करताना स्थानिक युवक.

Next
ठळक मुद्देनायगाव खोऱ्यात समाधान : बंधारे तुडुंब भरल्याने गावातच होतेय मासेमारी

दत्ता दिघोळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नायगाव : शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमुळे नायगाव खोºयातील युवकांना गावातच मासेमारीचा रोजगार उपलब्ध झाला आहे. मार्चपर्यंत बंधारे पाण्याने भरलेले असल्यामुळे शेतीबरोबरच मच्छीमारीचा व्यवसाय तेजीत असल्यामुळे नायगावकरांसाठी आर्थिक शुभवर्तमान मानले जात आहे.
गेल्या वर्षभरात नायगाव खोºयातील सर्वच गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून बांधारे, पाझरतलाव, नदी-नाले खोलीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यानंतर कोरडेठाक पडणारे बंधारे आज मार्च महिन्यातही पाण्याने भरलेले आहेत. त्यामुळे परिसरातील पाणी पातळी उंचावली असल्याने शेतीसाठी लागणारे जवळपास सर्वच गावातील बंधाऱ्यांमध्ये शेजारील काही शेतकºयांनी मत्स्यबीज टाकले होते.
चार ते पाच महिन्यांपूर्वी टाकलेल्या या माशांचे उत्पादन सध्या विक्रीसाठी तयार झाले आहे. त्यामुळे परिसरातील प्रत्येक गावांतील काही युवकांना मासेमारीचा व काही युवकांना मासे विक्रीचा रोजगार गावातच मिळत आहे.
प्रत्येक गावात सध्या माशांचे उत्पादन होत आहे. त्यामुळे खवय्यांना ताजे मासे मिळत असल्याने माशांना चांगली मागणी आहे. त्यामुळे शेतकºयांच्या माशांना व्यापाºयांकडून जागेवर शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत भाव मिळत आहे तर काही शेतकरी स्वत:च नायगाव येथील शनिवारच्या बाजारात हात विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे शेतकºयांना या जोडधंद्यामुळे आर्थिक दिलासा मिळत आहे.
माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे व युवामित्रच्या माध्यमातून झाले या कामांमुळे परिसरातील शेती बारमाही झाल्यामुळे शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.शेतीला जोडधंदा म्हणून शेतकºयांनी निवडलेला मच्छी पालनाचा व्यवसाय चांगलाच आर्थिक हातभार लावत आहे. यंदा पावसाचे प्रमाणही चांगले राहिल्यामुळे सर्वच बंधारे पूर्णक्षमतेने भरून वाहिल्याने व पाणी पातळी टिकून राहिल्याने या कालावधीत माशांचे उत्पादनातही चांगले आले आहे. आठवडाभरात एका बंधाºयातून साधारण ६० ते ७० किलो माशांचे उत्पादन निघत आहे.

Web Title: Employment of youth due to waterlogged Shivar Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.