जेसीआय नाशिक ग्रेपसिटी क्वीन्सतर्फे ‘एम्पॉवरिंग युथ’ कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:11 AM2021-05-31T04:11:40+5:302021-05-31T04:11:40+5:30
नाशिक : जेसीआय नाशिक ग्रेपसिटी क्वीन्सतर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी एम्पॉवरिंग युथ कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याअंतर्गत सहा वेगवेगळे ट्रेनिंग सेशन्स ...
नाशिक : जेसीआय नाशिक ग्रेपसिटी क्वीन्सतर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी एम्पॉवरिंग युथ कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याअंतर्गत सहा वेगवेगळे ट्रेनिंग सेशन्स घेतले जातात. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या शालेय व महाविद्यालयीन जीवन तसेच वैयक्तिक जीवनात सकारात्मकता येण्यासाठी हे ट्रेनिंग सेशन्स उपयुक्त ठरतात.
मात्र, कोविड-१९ आणि नाशिकमध्ये लागलेल्या लॉकडाऊनमुळे यंदा हे संभव न झाल्यामुळे अध्यक्ष वीणा चांडक यांच्याद्वारे डे केअर स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन एम्पॉवरिंग युथ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १५ मे ते २० मेदरम्यान झालेल्या ऑनलाईन कार्यक्रमाची सुरुवात लिडरशिप या विषयावर पराग जोशी यांच्याकडून झाली. दुसर्या दिवशी नॅशनल ट्रेनर पंकज जैन यांनी गोल सेटिंग या विषयावर मार्गदर्शन केले. तिसर्या दिवशी स्वप्नील पवार यांनी सोशल मीडियावरिल ‘डूज अॅण्ड डोन्ट’ या विषयावर भाष्य केले. चौथ्या दिवशी पराग घारपुरे यांनी ‘भावनादर्शक व्यवस्थापन (इमोटिकॉन्स मॅनेजमेंट)’ या विषयावर मार्गदर्शन केले. पाचव्या दिवशी जितेंद्र बोरा यांनी करिअर मॅनेजमेंट आणि सहाव्या दिवशी झोनल ट्रेनर डॉ. आनंद तांबट यांनी युनिव्हर्सल व्हॅल्यूज या विषयावर मार्गदर्शन केले. हे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डे केअर स्कूलचे प्राचार्य शरद गीते, अनुजा पाठक, सहभागी शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचेे सहकार्य लाभले. तसेच विनया तिसगांवकर, शीतल जोशी, सुप्रिया जैन, माधुरी पवार, वैशाली पारख, प्रसन्ना वारके, सारीका वाघमारे, श्रुती बोरा, सुवर्णा रोकडे, सुनीता पारख, दीपिका तांबट, रोहिणी येवले, मोनाली जाधव, पुनम दीक्षित तसेच पूर्ण एलजीबी टीम यांचे मार्गदर्शन लाभले.