नाशिक महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 11:42 PM2020-09-24T23:42:29+5:302020-09-25T01:25:19+5:30

नाशिक- कोरोनाच्या संकटामुळे सर्वांनाच खूप मोठा धडा मिळाला आहे. विशेषत: जाणवणाऱ्या उणिवा दूर करण्याची एक संधी मिळाली आहे. नाशिक महापालिकेच्या आरोग्य ...

Empowerment of Nashik Municipal Corporation's health system | नाशिक महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण

नाशिक महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण

Next


नाशिक- कोरोनाच्या संकटामुळे सर्वांनाच खूप मोठा धडा मिळाला आहे. विशेषत: जाणवणाऱ्या उणिवा दूर करण्याची एक संधी मिळाली आहे. नाशिक महापालिकेच्या आरोग्य यंत्रणा अत्यंत सक्षम होऊ लागल्या आहेत. नाशिक महापालिकच्या बिटको रूग्णालयात आता चारशे नवे बेड उपलब्ध होणार असून डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात देखील आॅक्सिजन बेडस वाढणार आहेत. नाशिक महपाालिकेचे बिटको, डॉ. झाकीर हुसेन, मोरवाडीतील श्री स्वामी समर्थ आणि पंचवटीतील इंदिरा गांधी रूग्णालय ही चार महत्वाची मोठी
रूग्णालये आहेत. याशिवाय छोटे रूग्णालये, प्रसुतिगृह, दवाखाने अशी मोठी यंत्रणा आहे. मात्र, त्यातुलनेत सुविधा खूप आहे, अशातील भाग नाही.
कोरोनाचे महासंकट आल्यानंतर जेव्हा सुरूवातीला शासकिय आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी महापालिकडे अवघे पाच व्हेंटीलेटर्स उपलब्ध होते. आज ही संख्या ५६ वर गेली आहे. शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्था सक्षम करावी लागेल अशी कल्पना नव्हती. महापालिकेत रस्ते, बांधकामे यांच्या तुलनेत दुय्यम स्थान असलेल्या वैद्यकिय विभागावर इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच खर्च करण्यात आला आहे.
शहरात महाालिकेची आणि खासगी मिळून ५७ कोविड सेंटर्स तर १३२ व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत. शहरात ९ कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.
त्यांची क्षमता १ हजार ७३५ खाटांची आहे. महापालिकेच्या नवे बिटको रुग्णालय २०० खाटांचे असून त्यात १०० खाटा आॅक्सीजनच्या तयार करण्यात आल्या आहेत. त्याच प्रमाणे गरजेनुसार ४८ खासगी कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. आता त्यात भर घालून दोनशे आॅक्सिजन बेड करण्यात आले आहे. यात आणखी किमान दोनशे बेड बिटको रूग्णालयात वाढणार आहे. तर सिडकोतील संभाजी स्टेडीयमच्या हॉलमध्ये दोनशे बेडचे रूग्णालय उभारण्यात येणार असून त्यात आॅक्सिजन बेडस उपलब्ध असतील. याशिवाय गरज भासल्यास पंचवटीत मीनाताई ठाकरे स्टेडीयममध्ये देखील दोनशे आॅक्सिजन बेडसचे नियोजन करण्यात आले आहेत.
नाशिक शहरात सरकारी व खासगी रुग्णालय मिळून एकूण ९४२ आॅक्सीजन बेड, ३५८ आयसीयू बेड व १३२ व्हेंटीलेटर्स सुविधा उपलब्ध आहेत.
आॅक्सिजन्सची सुविधा असलेले बेडस उपलब्ध झाले तरी आॅक्सिजनच्या उपलब्धतेची आणि साठ्याची मुळात गरज आहे. त्यामुळे बिटको रूग्णालयात आता २० केएल तर डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात दहा केएलची आॅक्सिजनची टाकी बसविण्यात येत आहे. आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकिय महाविद्यालयात सध्या कोरोनामुळे महापालिकेच्या
वतीने आॅक्सिजन टाक्या बसविण्यात येत असल्या तरी नंतर त्या महापालिकेसाठीच वापरल्या जाणार आहेत. पंचवटीतील इंदिरा गांधी रूग्णालय व मोरवाडीतील श्री स्वामी समर्थ रूग्णालयासाठी या टाक्यांचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेने वैद्यकिय व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्यावर भर दिला असून भविष्य काळातही चांगली व्यवस्था उपलब्ध होणार आहे.

 

Web Title: Empowerment of Nashik Municipal Corporation's health system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.