महिलांचे सबलीकरण काळाची गरज : परुळेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:58 AM2018-05-28T00:58:04+5:302018-05-28T00:58:04+5:30

महिलांचे आर्थिक सबलीकरण झाल्यास त्यांचे परावलंबित्व दूर होऊन त्या सक्षम होतील तसेच स्वयंविकासातून कौटुंबिक विकासही साधतील, असा विश्वास स्वयंसिद्धा प्रकल्पाच्या संचालिका कांचन परुळेकर यांनी व्यक्त केला असून, समाजाच्या विकासासाठी महिलांचे आर्थिक सबलीकरण करणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

 Empowerment of women needs time: Parulekar | महिलांचे सबलीकरण काळाची गरज : परुळेकर

महिलांचे सबलीकरण काळाची गरज : परुळेकर

googlenewsNext

नाशिक : महिलांचे आर्थिक सबलीकरण झाल्यास त्यांचे परावलंबित्व दूर होऊन त्या सक्षम होतील तसेच स्वयंविकासातून कौटुंबिक विकासही साधतील, असा विश्वास स्वयंसिद्धा प्रकल्पाच्या संचालिका कांचन परुळेकर यांनी व्यक्त केला असून, समाजाच्या विकासासाठी महिलांचे आर्थिक सबलीकरण करणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.  गोदाघाटावरील नाशिक वसंत व्याख्यानमालेत रविवारी (दि. २७) कांचन परुळेकर यांनी सत्ताविसावे पुष्प गुंफले. निर्मला केशव गरुड यांच्या स्मृतीत महिलांचे आर्थिक सबलीकरण विषयावर व्याख्यान देताना त्यांनी महिलांना स्वयंविकास व स्वयंरोजगाराविषयी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, सद्य:स्थितीत आर्थिक विकास हा धर्म झाला असल्याने महिलांनी आत्मभान, आत्मनिर्भरता आणि स्वावलंबनाची कास धरून भविष्याचा वेध घेतला पाहिजे. आर्थिक सक्षमीकरणासाठी महिलांनी स्वत:च पुढाकार घेणे गरजेचे आहे. शासनाने महिलांसाठी विविध क्षेत्रांत आरक्षण दिले असले तरी पंचायत राजमध्ये महिलांच्या आरक्षित जागांवर ७५ टक्के पुरुषच कार्यभार पाहत आहेत. महिलांच्या सबलीकरणात हा सर्वांत मोठा अडसर असून, महिलांनी आत्मनिर्भर हाणे गरजेचे आहे. समाजातील पुरु षांचे सबलीकरण झाले आहे. त्या तुलनेत महिलांचे सबलीकरण झालेले नाही. त्यासाठी संधीची वाट पाहण्याऐवजी महिलांनी स्वत:च संधी निर्माण करून त्याचे सोने करावे. पुरु षांनीही त्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. आई उद्योजक झाली, तर पुढची पिढी उद्योजक बनते, हे लक्षात घेऊन महिलांनी वाटचाल करणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी महिलांनी उद्योग व्यवसायात उतरण्याचे आवाहन केले.
आजचे व्याख्यान ,  विषय : कॉर्पोरेट कर्मयोग,  वक्ते : भावार्थ रामचंद्र देखणे

Web Title:  Empowerment of women needs time: Parulekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक