विक्रेत्यांनी बळकावलेली जागा दोन तासांत रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:32 AM2018-12-14T01:32:03+5:302018-12-14T01:32:23+5:30
सातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील भाजीविक्रेत्यांनी प्रमाणापेक्षा अधिक जागा बळकावून त्यावर साठवलेला भाजीपाला महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात जप्त करीत जागा मोकळी करून घेतली. या मोकळ्या केलेल्या जागेवर मंडईबाहेरील विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी तीन ट्रक माल जप्त करण्यात आला.
सातपूरगावातील श्री छत्रपती शिवाजी मंडईतील विक्रेत्यांनी अतिरिक्त जागेवर ठेवलेला भाजीपाला पोलीस बंदोबस्तात जप्त करताना महापालिका कर्मचारी.
सातपूर : सातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील भाजीविक्रेत्यांनी प्रमाणापेक्षा अधिक जागा बळकावून त्यावर साठवलेला भाजीपाला महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात जप्त करीत जागा मोकळी करून घेतली. या मोकळ्या केलेल्या जागेवर मंडईबाहेरील विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी तीन ट्रक माल जप्त करण्यात आला.
गेल्या अनेक दिवसांपासून मंडईच्या आतील आणि बाहेरील भाजीविक्रेत्यांमध्ये वाद सुरू आहे, तर मंडईबाहेरील रस्त्याच्या कडेला बसलेल्या अनधिकृत विक्रेत्यांना हटवून रस्ता मोकळा करावा, अशी ग्रामस्थांची सततची मागणी आहे. महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी धडक मोहीम राबवून कारवाई करण्यात आली आहे. वेळोवेळी सांगूनही ऐकत नसल्याने गुरुवारी विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्तात धडक मोहीम राबविण्यात आली. मंडईतील भाजीविक्रेत्यांनी निश्चित केलेल्या जागेव्यतिरिक्त वाढीव जागेवर कब्जा करत भाजीपाला साठवून ठेवलेला होता. तो सर्व भाजीपाला जप्त करण्यात आला. यावेळी विक्रेत्यांनी विरोध करीत वाद घातला. परंतु पोलिसांनी वाद मोडून काढलाआणि जागा खाली करण्यास सांगण्यात आले.
यावेळी विक्रेत्यांनी दोन तासांचा वेळ मागून घेतला. दुपारनंतर बहुतांश विक्रेत्यांनी जागा खाली करून दिल्याने मनपा कर्मचाऱ्यांनी ठरवून दिलेल्या विक्रेत्यांना जागेवर बसण्यास सांगण्यात आले. जवळपास तीन ट्रक माल जप्त करण्यात आला.