शहरातील पर्यटनस्थळांवर ‘सक्षम’ स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 02:10 PM2018-06-11T14:10:13+5:302018-06-11T14:10:13+5:30
धबधब्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छताही यावेळी होते. यामुळे गोदावरीच्या प्रदूषणालाही निमंत्रण मिळते. पर्यटक बेभाणपणे मक्याच्या कणीसपासून तर सर्वच प्रकारचा कचरा आजुबाजुला फेकतात. या ठिकाणी महापालिकेच्या वतीने कचराकुं ड्याही सुरक्षितरित्या बसविण्यात आलेल्या नाही.
नाशिक : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर व शहराजवळच्या परिसरातील पर्यटनस्थळे गजबजणार आहे; मात्र या पर्यटनस्थळांवर आनंद लुटताना तेथील स्वच्छतेचा पर्यटक कितपत विचार करतात हा मोठा प्रश्न आहे. पर्यटनस्थळांवरील अस्वच्छता आणि बकालपणा हटविण्यासाठी शहरातील तरुणांचा ‘सक्षम फाउण्डेशन’ या ग्रूपने पुढाकार घेतला आहे. सोमेश्वर धबधब्यापासून स्वच्छता अभियानाला रविवारपासून प्रारंभ करण्यात आला.
शहरातील पर्यटनस्थळे स्वच्छ रहावी, जेणेकरून तेथे शहरासह अन्य राज्यांमधील विविध शहरांमधून येणाऱ्या पर्यटकांना त्याचा मनमुराद आनंद लुटता यावा, यासाठी ‘स्वच्छ नाशिक, स्वच्छ पर्यटन’ अशी संकल्पना घेऊन तरुण मित्र-मैत्रिणींच्या या फाउण्डेशनने पुढाकार घेतला आहे. सोमेश्वर धबधबा हा नेहमीच सर्वांच्या पसंतीचा राहिलेला आहे. हा धबधबा वाहू लागला की पर्यटकांची जत्रा भरलेली येथे पहावयास मिळते. धबधब्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छताही यावेळी होते. यामुळे गोदावरीच्या प्रदूषणालाही निमंत्रण मिळते. पर्यटक बेभाणपणे मक्याच्या कणीसपासून तर सर्वच प्रकारचा कचरा आजुबाजुला फेकतात. या ठिकाणी महापालिकेच्या वतीने कचराकुं ड्याही सुरक्षितरित्या बसविण्यात आलेल्या नाही. त्यामुळे सोमेश्वर येथील दुधसागर धबधब्याच्या परिसरात या फाऊण्डेशनच्या सदस्यांनी स्वच्छता मोहिम राबवून तेथील कचरा संकलितत केला. रविवारी दुपारी चार ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या परिसरात स्वच्छता करण्यात आली. यामध्ये फाउण्डेशनचे अध्यक्ष रज्जत शर्मा, उपाध्यक्ष राम पवार, हिना शर्मा, राजश्री शर्मा, दुर्गेश पाटील आदिंनी सहभाग घेतला. या रविवारपासून अभियानाला सुरूवात करण्यात आली आहे. दर रविवारी एका पर्यटनस्थळाची निवड करत त्या ठिकाणी दोन ते तीन तास स्वच्छता करण्याचा मानस असल्याचे रज्जत शर्मा यांनी सांगितले.