एन्झोकेम विद्यालयात ‘संगीतरजनी’त रसिक मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:42 PM2020-01-13T22:42:26+5:302020-01-14T01:15:55+5:30
विजेच्या रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट, वाद्यांचा ताल, लयबद्ध थिरकणारी पावलं, लचकणारी कंबर अन् आबालवृद्ध प्रेक्षकांनी टाळ्यांची दिलेली दाद...अशा प्रसन्न आणि तेजोमय वातावरणात विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते संगीतरजनीसह एन्झोकेम हायस्कूल व श्रीमान शेठ गंगाराम छबिलदास उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे.
येवला : विजेच्या रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट, वाद्यांचा ताल, लयबद्ध थिरकणारी पावलं, लचकणारी कंबर अन् आबालवृद्ध प्रेक्षकांनी टाळ्यांची दिलेली दाद...अशा प्रसन्न आणि तेजोमय वातावरणात विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते संगीतरजनीसह एन्झोकेम हायस्कूल व श्रीमान शेठ गंगाराम छबिलदास उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे.
खुशी भुजबळ, सायली वाघमोडे, मोनिका वाबळे व ग्रुप, सोहम वाघ, रसिका चव्हाण, श्रद्धा धनवटे व ग्रुप, धनराज वाघमोडे व ग्रुप, हर्षद परदेशी व ग्रुप, आर्या वाघचौरे, तन्वी सूर्यवंशी, गौरी कचेरिया व ग्रुप, रितेश वाबळे, साई जाधव व ग्रुप, दीपक काळे, ऋ षिकेश पगारे व ग्रुप, अक्षदा लोखंडे, जान्हवी विटनोर व ग्रुप, आयुष मापारी, प्रियंका जाधव, प्रणाली वाघ व ग्रुप, श्रीराज कांबळे, स्वरदा वानरे व ग्रुप, गौरी मोरे व ग्रुप, मानसी गरु ड, ज्ञानेश्वरी खोकले व ग्रुप यांचा समावेश होता. कार्यक्र माची सुरु वात सरस्वती, तात्या टोपे, नटराज यांच्या प्रतिमापूजनाने झाली. प्रमुख अतिथी उद्योजक किशोर राठी, कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे, पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी उद्घाटन केले. प्राचार्य दत्ता महाले यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष पंकज पारख, उपाध्यक्ष रमेशचंद्र पटेल, सरचिटणीस सुशील गुजराथी, कोषाध्यक्ष डॉ. मनीष गुजराथी, संचालक प्रफुल्ल गुजराथी, श्रीकांत पारेख, रघुनाथ खैरनार, रोशन भंडारी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्र माचे सूत्रसंचालन रंजना चौधरी, वीणा पराते, सरस्वती नागपुरे, सुहासिनी चित्ते, प्रेरणा जोशी, सारिका चौधरी, सुरेखा गिरासे, रामेश्वरी शिंदे, आसावरी जोशी, प्रा. बाळासाहेब हिरे व अविनाश कुलकर्णी यांनी केले. कार्यक्र मास ब्रह्माकुमारी नीता दीदी, रघुनाथ खैरनार, सत्यजित कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, किशोर सोनवणे, भालचंद्र कुक्कर, नारायण रायजादे, गुलाब सोनावणे, राजेंद्र धसे, अनिल साळुंके, दादासाहेब वाघमोडे, पूनम वाघमोडे, अरु ण विटनोर, बाबासाहेब काळे आदी उपस्थित होते.
कार्यक्र माचे नियोजन उत्सवप्रमुख दत्ता उटवाळे, वनिता वाघ, उपप्राचार्य संजय बिरारी, पर्यवेक्षक कैलास धनवटे, राजेंद्र गायकवाड, पुष्पा आहेर यांनी केले.
सतीश विसपुते, प्रकाश सोनवणे, रमेश माळी, विजय क्षीरसागर, प्रसेन पटेल, शुभांगी खाखिरया, सारिका चौधरी, रंजना चौधरी, सुरेखा राजपूत, आसावरी जोशी, प्रेरणा जोशी, शीतल शिंदे, स्वाती सानप, पुष्पा कांबळे, माधवराव गायकवाड, उत्तम पुंड, विजय साळुंके, कैलास पाटील, कैलास चौधरी, किशोर सोनवणे, रजिवान शेख, सुनील कोटमे, जनार्दन भनगडे, अंकुश गाडेकर, गोविंद सुंभे, बापू कुलकर्णी, सुभाष नागरे, अनिल शेलार, नीलेश निकम, विशाल कळमकर, विजय पैठणे, सागर लोणारी, राम पटेल, प्रशांत नागरे, अंकुश ललवाणी, अरविंद जोरी, अशोक सोनवणे, अनिल पगारे, संदीप खोजे, मारु ती माळी, भास्कर लहरे यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थी हितासाठी दानशुरांचे दातृत्व
कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी भोजनालय बांधून देणार आहेत. उमेश कंदलकर यांनी विद्यार्थी सुरक्षा हेतूने शाळेच्या आवारात सीसीटीव्ही यंत्रणा बसवून बसवून दिली, तर उद्योगपती किशोर राठी विद्यालयाला अद्ययावत संगणक प्रयोगशाळा तयार करून देणार आहेत. सामाजिक जाणीव ठेवत येथील शिक्षक दाम्पत्य दादासाहेब वाघमोडे व त्याच्या पत्नी पूनम वाघमोडे यांनी विद्यालयास दहा पंखे भेट दिले. त्याबद्दल सर्व दानशुरांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला.