एन्झोकेम विद्यालयात विज्ञान दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:21 AM2018-03-01T00:21:58+5:302018-03-01T00:21:58+5:30
सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळाच्या एन्झोकेम विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी नोबेल पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे प्राचार्य विजय नंदनवार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. व्यासपीठावर प्रा. अविनाश कुलकर्णी, प्रा. कैलास धनवटे, बाळासाहेब हिरे, विजय क्षीरसागर, दत्तकुमार उटावळे, पर्यवेक्षक दत्ता महाले उपस्थित होते.
येवला : सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळाच्या एन्झोकेम विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी नोबेल पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे प्राचार्य विजय नंदनवार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. व्यासपीठावर प्रा. अविनाश कुलकर्णी, प्रा. कैलास धनवटे, बाळासाहेब हिरे, विजय क्षीरसागर, दत्तकुमार उटावळे, पर्यवेक्षक दत्ता महाले उपस्थित होते. प्रमुख वक्ते प्रा. राजेंद्र गायकवाड यांनी चंद्रशेखर रमण यांना रमण इफेक्ट या संशोधनामुळे नोबल पुरस्कार मिळाल्याचे सांगितले. प्रा. दत्तकुमार उटावळे यांनी विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा खोडून काढण्याचा प्रयत्न करावा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचे आवाहन केले. प्राचार्य विजय नंदनवार यांनी बुवाबाजी, अंधश्रद्धा यांचे डोळसपणे निर्मूलन करण्याचे आवाहन केले. विद्यार्थी प्रवीण जाधव, अक्षय दाणे, प्रेम इसमपल्ली, ज्ञानेश्वरी खोकले यांची भाषणे झाली. नम्रता ससाणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. पुष्पा कांबळे यांनी आभार मानले.