औरंगाबाद रस्त्यावरील अतिक्रमणे काढली

By admin | Published: November 14, 2016 12:12 AM2016-11-14T00:12:38+5:302016-11-14T00:12:10+5:30

औरंगाबाद रस्त्यावरील अतिक्रमणे काढली

The encroachment on Aurangabad road was removed | औरंगाबाद रस्त्यावरील अतिक्रमणे काढली

औरंगाबाद रस्त्यावरील अतिक्रमणे काढली

Next


नांदगाव : रस्त्याला अडथळा असलेली अनधिकृत धार्मिक स्थळे तोडण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये येथील औरंगाबाद रस्त्यावरील लक्ष्मीचे मंदिर व सोनवणे पेट्रोलपंपालगतचे पिराचे थडगे आज पोलीस बंदोबस्तात काढण्यात
आले.
आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास विधिवत पूजा केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तहसीलदार चंद्रकांत देवगुणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आनंद, नगपरिषदेचे मुख्याधिकारी विश्वंभर दातीर, अभियंता अभिजित इनामदार यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. यावेळी कर्मचारी वर्गसुद्धा उपस्थित होता.
कारवाईपूर्वी नोटिसा देण्यात आल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आनंद यांनी मालेगाव रस्ता, शनिमंदिर पूल व रहदारी बंगल्याच्या रस्त्यावरील अतिक्रमणे पुढच्या टप्प्यात हटवणार असल्याची माहिती दिली.
धार्मिकस्थळांवर केलेली कारवाई नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली. हे विशेष आहे. कारवाई दरम्यान प्रतिकार करण्यात आला नाही.
(वार्ताहर)

Web Title: The encroachment on Aurangabad road was removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.