भगूरला राजकीय वरदहस्ताने अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:40 AM2019-01-13T00:40:58+5:302019-01-13T00:41:45+5:30
भगूरच्या रेल्वेगेट नवीन उड्डाणपुलाजवळील मुख्य वाहतूक रस्त्यावर काही राजकीय नेत्यांनी बेकायदेशीरपणे पत्र्याच्या शेडचे दुकाने टाकून अतिक्रमण केले असून, त्याकडे देवळाली छावणी परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम खाते लक्ष देत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्तकेली आहे.
भगूर : भगूरच्या रेल्वेगेट नवीन उड्डाणपुलाजवळील मुख्य वाहतूक रस्त्यावर काही राजकीय नेत्यांनी बेकायदेशीरपणे पत्र्याच्या शेडचे दुकाने टाकून अतिक्रमण केले असून, त्याकडे देवळाली छावणी परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम खाते लक्ष देत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्तकेली आहे.
नाशिक, इगतपुरी तालुक्यांतून सिन्नर, भगूरसह विविध शहरात जाण्यासाठी नाका नंबर दोन ते नवीन रेल्वेगेटमधून जाण्यासाठी मोठा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. या रस्त्याच्या बाजूलाच नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू असून, दुसऱ्या बाजूला दगडी चाळ, दलित सोसायटीची घरे आहेत. या रस्त्यावर यापूर्वी एकही टपरी अथवा दुकान नव्हते, परंतु नवीन रेल्वेगेट पुलाचे काम सुरू झाले तेव्हापासून परिसरातील राजकीय मंडळींनी रस्त्यालगत मोठमोठ्या पत्र्याच्या बेकायदेशीर टपºया थाटल्या आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला असून, देवळाली छावणी परिषद व सार्वजनिक बांधकाम खाते काहीच कार्यवाही करीत नसल्याचे पाहून नव्याने टपºयांचे अतिक्रमण वाढू लागले असून, काहींनी तर या रस्त्यावर आगावू जागा राखून ठेवल्या आहेत. देवळाली परिषदेने तत्काळ या वाढत्या अतिक्रमणाची दखल घेऊन ते काढून टाकावे अन्यथा रस्ता वाहतुकीसाठी शिल्लकच राहणार नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.