चेहेडी पंपिंग उज्ज्वल कॉलनी येथील  बंगल्यांमागील अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:18 AM2018-04-26T00:18:18+5:302018-04-26T00:18:18+5:30

चेहेडी पंपिंग उज्ज्वल कॉलनी येथील निवारा रोहाऊस मधील १८ बंगल्यांचे पाठीमागील पत्र्याचे शेड व काही बंगल्याच्या पुढील पोर्चमधील अनधिकृत बांधकाम बुधवारी मनपा अतिक्रमणविरोधी पथकाने काढण्यास सुरुवात केली.

The encroachment of the Chelsea Pumping Bungalow at Bangalore was deleted | चेहेडी पंपिंग उज्ज्वल कॉलनी येथील  बंगल्यांमागील अतिक्रमण हटविले

चेहेडी पंपिंग उज्ज्वल कॉलनी येथील  बंगल्यांमागील अतिक्रमण हटविले

googlenewsNext

नाशिकरोड : चेहेडी पंपिंग उज्ज्वल कॉलनी येथील निवारा रोहाऊस मधील १८ बंगल्यांचे पाठीमागील पत्र्याचे शेड व काही बंगल्याच्या पुढील पोर्चमधील अनधिकृत बांधकाम बुधवारी मनपा अतिक्रमणविरोधी पथकाने काढण्यास सुरुवात केली. चेहेडी पंपिंग येथील निवारा रोहाऊसमध्ये २२ बंगले असून, त्यापैकी १८ बंगलेधारकांनी बंगल्याच्या पाठीमागे पत्र्याचे शेड व काही बंगलेधारकांनी पुढील सामासिक अंतरामध्ये पक्के बांधकाम केले होते. मनपा अतिक्रमणविरोधी पथकाने हिरामण ताजनपुरे, सरला कोकणे, अरुण ताजनपुरे, विनायक कोठावदे, सागर कळमकर, तुकाराम धोंगडे, प्रभाकर शेट्टी, बाळासाहेब वाणी, बाबाजी गुंजाळ, गणपत घोरपडे, उमेश रोडे, सुनील लोहाटे, लक्ष्मण निकम, गोरख उगले, कैलास गायकर, सुनील पाटील या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस बजावली होती.
मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी अतिक्रमणविरोधी पथकाने बंगल्याच्या पाठीमागील अनधिकृत पत्र्याचे शेड गॅसकटरने व इतर साहित्याने काढुन टाकण्यात आले. काही बंगलेधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढले, तर चार बंगल्याच्या पुढील अनधिकृतपणे केलेले पक्के बांधकाम तोडण्यात आले.
सायंकाळपर्यंत पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू होती. राहिलेले अतिक्रमण उद्या गुरुवारी काढण्यात येणार असल्याचे मनपाच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून नाशिकरोड परिसरातमहापालिकेच्या वतीने अतिक्रमण मोहीम राबविण्यात येत असल्याने अनधिकृत बांधकाम केलेल्यांचे धाबे दणाणले आहे.
धाबे दणाणले
चेहेडी पंपिंग भागात गुंठेवारी पद्धतीने मोठ्या प्रमाणात पक्के बांधकाम करण्यात आले आहे, तर छोट्या-मोठ्या रोहाउसच्या अनेक स्किम पूर्ण आहेत. मात्र त्याठिकाणीदेखील अनेकांनी अनधिकृतपणे कच्चे-पक्के अतिक्रमण केले आहे. मनपाच्या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: The encroachment of the Chelsea Pumping Bungalow at Bangalore was deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.