कॉलेजरोड परिसरात अतिक्रमणाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:51 AM2019-05-21T00:51:50+5:302019-05-21T00:52:08+5:30
गेल्या काही दिवसांमध्ये कॉलेजरोडवरील अनेक रस्ते आणि फुटपाथ अतिक्र मणांच्या विळख्यात सापडले आहेत. राष्ट्रीय फेरीवाला कायद्यानुसार पथारी व्यावसायिक आणि विक्रे त्यांवर कारवाई करण्यात पालिकेवर काही मर्यादा आहेत.
नाशिक : गेल्या काही दिवसांमध्ये कॉलेजरोडवरील अनेक रस्ते आणि फुटपाथ अतिक्र मणांच्या विळख्यात सापडले आहेत. राष्ट्रीय फेरीवाला कायद्यानुसार पथारी व्यावसायिक आणि विक्रे त्यांवर कारवाई करण्यात पालिकेवर काही मर्यादा आहेत. मात्र, पालिकेकडे नोंदणी केलेले फेरीवाले व पथारी व्यावसायिकांना प्रमाणपत्राचे वाटप करून पालिकेने कारवाईवर लक्ष केंद्रित करावे.
कॉलेजरोडवर हॉटेल, टपऱ्या, फेरीवाले आणि आॅटो रिक्षाचालकांच्या अतिक्रमणाने विळखा घातला आहे. थत्तेनगर रस्त्याच्या कडेला खेटूनच अनेक टपऱ्यांनी, दाबेलीचे गाडे यांसह अन्य व्यावसायिकांनी बस्तान मांडले आहे. सुरु वातीला तात्पुरती असलेली ही अतिक्र मणे आता कायमस्वरूपी झाली आहेत. या रस्त्यावर अतिक्र मणासोबत फेरीवाले तसेच आॅटो रिक्षाचा गराडा रोडला कायम पडलेला असतो. खाद्यपदार्थांच्या हातगाड्या या भागात अधिक असतात. या रोडने जाताना वाहनधारकांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. खाद्यपदार्थ विक्रे ते असलेल्या या फेरीवाल्यांकडे ग्राहकांची गर्दी होत असल्याने त्यांची वाहनेदेखील रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे इतर वाहनधारकांना अडथळ्यांची शर्यत पार पाडत रस्ता ओलांडावा लागतो. या फेरीवाल्यांच्या अतिक्र मणामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असून, महापालिका याकडे कधी लक्ष देणार? असा प्रश्न केला जात आहे.
कॉलेजरोडवरील वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे पालिकेने बेकायदा पद्धतीने व्यवसाय करणाºयांवर कारवाई करावी तसेच फुटपाथवर अतिक्र मण करणाºयांवर, हॉटेल चालकांवर कारवाई करावी, यासाठी नागरिकांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. परंतु कारवाई झालीच नाही. आता कॉलेज रस्त्यावर फुटपाथवरील पथारी व्यावसायिक व फेरीवाल्यांवर अतिक्र मण कारवाईचा हातोडा फिरवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
अनधिकृत दुकानदारांमुळे गुन्हेगारीला चालना
कॉलेजरोडवर थत्तेनगर कॉर्नर ते कॅनडा कॉर्नर भागात अतिक्र मणांमुळे गुन्हेगारी वाढीस लागली असून, बेकायदा हातगाड्या या गुन्हेगारांचे अड्डे झालेले आहेत. हातगाड्यांच्या भोवती असलेल्या मुलांकडून मुलींची छेड काढली जाते. तसेच किरकोळ कारणावरून वाद करून त्यांना लुटणे असे प्रकारही येथे चालतात. अधिकृत दुकानदारांना सर्व प्रकारचे नियम, कायदेकानून आहेत. परंतु बेकायदा काम करणाºयांना मात्र निर्बंध नसून त्यामुळे अधिकृत व्यवसाय करणाºयांचे कंबरडे मोडले आहे.