वकीलवाडीत अतिक्रमणे ‘जैसे थे’; पालिकेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:13 AM2017-11-29T00:13:20+5:302017-11-29T00:14:23+5:30
शहरातील वकीलवाडी परिसरातील दुकानदारांची अतिक्रमणे ‘जैसे थे’ असून, यामुळे पादचाºयांना चालणेही कठीण झाले आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने अतिक्रमणे हटविण्याची केलेली कार्यवाही केवळ औपचारिकताच ठरली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही वकीलवाडी परिसरात महापालिका आणि वाहतूक पोलीस त्याकडे लक्ष पुरवत नाही.
नाशिक : शहरातील वकीलवाडी परिसरातील दुकानदारांची अतिक्रमणे ‘जैसे थे’ असून, यामुळे पादचाºयांना चालणेही कठीण झाले आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने अतिक्रमणे हटविण्याची केलेली कार्यवाही केवळ औपचारिकताच ठरली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही वकीलवाडी परिसरात महापालिका आणि वाहतूक पोलीस त्याकडे लक्ष पुरवत नाही. या ठिकाणी एकेरी मार्ग असूनही त्याचा उपयोग होत नाही. वाहतूक पोलीस असलेच तर त्यांच्यासमोर रॉँगसाईडने गाडी घातली जाते. असे अनेक प्रकार आहेत. येथील बहुतांशी व्यापारी संकुलांनी वाहनतळासाठी पुरेशी जागा सोडलेली नाही. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे भीड चेपली गेलेल्या अनेकांनी दुकानांची अतिक्रमणे, जाहिरात फलक थेट रस्त्यावर आणून ठेवली होती. परंतु त्यांच्यावरदेखील कारवाई होत नाही. मध्यंतरी महापालिकेने काही फलक उचलून नेले, त्या व्यतिरिक्त कोणतीही कारवाई होत नसल्याने अशा दुकानदारांचे फावले आहे. रस्त्यावर कुठेही उभी केलेली वाहने, जोडीला खाद्य विक्रेत्यांची अतिक्रमणे, अरुंद मार्गावर मालवाहतूक करणाºया टेम्पोने होणारी वाहतूक कोंडी आणि एकेरी वाहनांच्या नियमांचे सर्रास उल्लंघन या सर्व प्रकारांमुळे येथील रहिवाशांना चालणे कठीण झाले आहे.
शहराच्या विविध भागांसाठी महापालिका आणि वाहतूक पोलीस नियोजन करतात, परंतु या भागाला मात्र जाणीवपूर्वक वगळण्यात येत असल्याची टीका नागरिकांनी केली आहे. वाहनतळ नसतानाही व्यापारी संकुले बांधणाºया आणि ती भाड्याने देणाºयांवर पोलीस आणि महापालिका प्रशासन कारवाई का करीत नाही, असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहे.