अतिक्रमण केल्याने ग्रामपंचायतीचे सदस्यत्व रद्द
By admin | Published: February 10, 2016 10:17 PM2016-02-10T22:17:11+5:302016-02-10T22:43:51+5:30
अतिक्रमण केल्याने ग्रामपंचायतीचे सदस्यत्व रद्द
सायखेडा : येथील ग्रामपंचायत सदस्य सारिका राजगुरू यांनी पदाचा गैरवापर करून सरकारी जागेत अतिक्रमण केल्याबद्दल त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिले आहेत.
अर्जदार कृष्णा आघाव व इतर मयांनी सायखेडा येथील ग्रामपंचायत सदस्य सारिका प्रकाश राजगुरू यांनी व त्यांच्या कुटुंबाने सरकारी जागेत अतिक्रमण केले म्हणून त्यांच्या विरोधात अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे विवाद अर्ज दाखल केला होता. अर्जात म्हटले आहे की, सारिका प्रकाश राजगुरू या सन २०१५ ते २०२० या कालावधीकरिता सायखेडा ग्रामपंचायतीमधून निवडून आलेल्या सदस्य आहेत. तसेच त्यांचे पती प्रकाश बाबूराव राजगुरू हे सन २०१० ते २०१५ या कालावधीमध्ये उपसरपंच होते. ते उपसरपंच असताना त्यांनी पदाचा गैरवापर करून सरकारी गट क्र मांक ४८७ मिळकत क्रमांक ६१३ या जागेत आरसीसी बांधकाम करून दुमजली इमारत बांधली. यासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता फॅब्रिकेशनचा व्यवसाय करीत असून, सारिका राजगुरू व पती यांच्या संगनमताने ग्रामपंचायत सायखेडा यांचे गाव नमुना नं. ८च्या आकारणी यादीमध्ये प्रकाश बाबूराव राजगुरू व त्यांचा भाऊ कचेश्वर राजगुरू यांची नावे नोंदणी करून घेतली.(वार्ताहर)